ताज्या घडामोडी

मतदान केंद्रावर नियुक्त पथकाने पारदर्शक व अचूक निवडणूक प्रक्रिया राबवावी श्री शैलेश लाहोटी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी विधानसभा मतदारसंघात निवडणुक कामांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न झाले या प्रशिक्षणासाठी 98 पाथरी मतदार संघातील 415 मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या 2 हजार 142 कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दोन सत्रात शासकीय नवीन गोदाम ( शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था ) विटा रोड पाथरी येथे संपन्न झाले यावेळी उपस्थित सर्व मतदान अधिकाऱ्यांना निवडणूक संदर्भातील मतदान केंद्रावरील कामे करताना पूर्ण टीमने मतदानाची निःपक्षपाती, पारदर्शक व अचूक प्रक्रिया राबविल्यास कोणतेही अडचण येणार नाही असे मार्गदर्शन श्री शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी पाथरी यांनी केले.


दुसऱ्या प्रशिक्षणात 477 मतदान केंद्राध्यक्ष , 623 प्रथम मतदान अधिकारी ,1043 इतर मतदार अधिकारी एकूण 2 हजार 142 मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती मा. निवडणूक अधिकारी तथा जिल्हा अधिकारी परभणी यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातील कामासाठी केली आहे. दुस-या प्रशिक्षणात 2 हजार 87 मतदान अधिकारी उपस्थित होते तर 55 मतदान अधिकारी प्रशिक्षणास गैरहजर होते या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती श्रीशैलेश लाहोटी यांनी दिली.
प्रशिक्षणात दोन्ही सत्रामध्ये मतदान अधिकार्‍यांना मतदान प्रक्रिया विषय सर्व माहिती देण्यात आली निवडणूक कामाचे महत्व व त्यानुसार निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रक्रिया त्या त्या वेळी पूर्ण करण्याच्या बाबीचे मार्गदर्शन प्रशिक्षण प्रमुख श्री पांडुरंग माचेवाड तहसीलदार मानवत , श्री शंकर हांदेश्वार तहसीलदार पाथरी, श्री सुनील कावरखे तहसीलदार मानवत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करून माहिती दिली. तसेच प्रशिक्षण स्थळी ईव्हीएम हाताळणीसाठी ठेवण्यात आल्या होत्या मास्टर ट्रेनर यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम हाताळणी करून ईव्हीएम संदर्भातील प्रक्रिया समजून घेतल्या
प्रशिक्षण दरम्यान दुसर्‍या सत्रात निवडणूक निरीक्षक श्रीमती संचिता बिष्णोई यांनी भेट देऊन निवडणूक प्रशिक्षण कामाची पाहणी करून निवडणूक निर्णय अधिकारी श्री शैलेश लाहोटी यांच्या नियोजनाची प्रशंसा करून समाधान व्यक्त केले.
श्री. मुकेश राठोड गट शिक्षणाधिकारी पाथरी यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे व प्रशिक्षणार्थी यांचे आभार व्यक्त करून प्रशिक्षणाची सांगता झाली प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी वसंत महाजन नायब तहसीलदार पाथरी , श्री मुकेश राठोड गट शिक्षणाधिकारी पाथरी,श्री सूर्यकांत कीटे स.ग. वि.अधिकारी,श्री गजानन अन्नपुरे ,श्री जामकर, श्री केसकर, श्री.संदीपान घुंबरे मीडिया प्रमुख, जमील सिद्दीकी, गजानन गायकवाड, श्री मनेरे यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण स्थळी पंकज बिराजदार शिक्षक यांनी काढलेल्या मतदान जनजागृती चे संदेश देणारे रांगोळी चित्र याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close