शेतकऱ्यांचे आराध्य दैवतेचा इतिहास धोक्यात
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वनिर्मित गुरुकुंज आश्रम (मोझरी) वास्तूच्या रक्षणासाठी “स्मारक बचाव कृती समितीचा ” जाहीर कार्यक्रम-
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
सन्मानीय गुरुदेव भक्त, व जनतेला कळविण्यात येते की, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावन स्पर्शाने, त्यांच्या देखरेखीत तयार झालेले” गुरुकुंज आश्रम( मोझरी)” हे आज जनता जनार्दनाचे श्रद्धास्थान आहे. शेतकऱ्यांचे कुलदैवत असून, ग्रामगीता प्रबोधनाचे ते माहेर आहे. ग्रामगीते च्या मार्गदर्शनाने समाजाला बळ देणारे गुरुदेव भक्तांचे ते ज्ञानपीठ आहे.तसेच सामुदायिक प्रार्थनेद्वारे, शांतीचा महामंत्र, देणारे समभावाचे प्रतीक म्हणून * सर्वधर्मक्षेत्र * सुद्धा आहे. “कच्चामाल मातीच्या भावे,पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील ग्राम जन , पिकवूनिया उपासी “या एका ओळीत शेतकऱ्यांना देशाचे आर्थिक धोरण समजावून सांगितले, ग्रामगीते मुळे गुरुकुंजआश्रम हे शेतकऱ्यांचे स्फूर्ती देणारे एक प्रेरणा स्थान झाले असून, ते आता राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित व्हावे. वंदनीय महाराजांच्या जेथे स्मृती जतन केलेल्या आहेत तो इतिहासच समूळ नष्ट होत असेल तर जनतेनी आपले डोळे मिटून का पहावे? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही? अशा ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे हे शासनाचेच नव्हे तर जनतेचे सुद्धा प्रामाणिक कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील , सेवाग्राम येथील महात्मा गांधीच्या बापू कुटीचे व विनोबा भावे यांच्या पवनार कुटिचे (जि. वर्धा) शासन जर जतन करते,तर शेतकऱ्यांचा उद्धार करीत असलेल्या गुरुकुंज
आश्रम या राष्ट्रीय स्मारकाचे शासन का जतन करू शकत नाही? हे स्मारक नष्ट करून शेतकऱ्याचा इतिहास संपवावा, असे डावपेच तर आखले जात नाही ना? अशी शंका जनतेला आल्याशिवाय राहत नाही.
याठिकाणी शेतकऱ्यांच्या व समाजाच्या भावना एकवटलेल्या असताना त्या ऐतिहासिक स्मारकाला पाडण्याचे षडयंत्र अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ चे कार्यकारिणी संचालक मंडळ व काही नेते एकत्र सहभागी होऊन करीत असेल,तसेच प्रार्थना मंदिर ,महाद्वार , जीर्ण झाल्याचे दाखऊन ,ते पाडण्याचे कटकारस्थान करीत आहे, असे जनतेच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे वंदनीय राष्ट्रसंताचा विचार प्रवाह टिकवणाऱ्या गुरुदेव भक्तांची केविलवाणी व चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. गुरुदेव भक्तांचा श्वास म्हणजे गुरूकुंजआश्रम व प्रार्थना मंदिर आहे. स्मृती मंदिर उभारतांना महाराजांच्या पावलांचा स्पर्श व सुगंध आज हि तीथे दरवळतो आहे,त्या परिसरा साठी जनतेचा एक – एक पैसा जमा करून, बांधकाम केले असताना, समाजातील पुढील नविन पिढीला, तरुण युवक-युवतींना व ग्रामीण जनतेला, विकासाची दिशा देणारे ते एकमेव आदर्शवादी स्मारक असून, गुरुदेव शक्तीचे बलशाली व्यासपीठ आहे.म्हणूनच वं. राष्ट्रसंतानी बांधलेल्या स्वनिर्मित पवित्र वास्तूला कुठेही गालबोट लागू नये अशी सर्वसाधारण गुरुदेव भक्तांची व शेतकऱ्यांची इच्छा आहे . राष्ट्रसंतांची कल्पना शेतकऱ्यांना सुखी करण्याची होती, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, व पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना महाराजांनी या देशातील शेतकरी सुखीहोण्यासाठी विनंती केली होती. 18जून1951 ला ज्यांनी कायदे केले ,तेच कायदे लोकसे रद्द करणार ?असा तेव्हा प्रश्न उपस्थित झाला . व राष्ट्रसंताची केलेली मागणी हवेतच विरली. म्हणून जनतेला त्यांनी पुन्हा स्मरण करून, ग्रामगीता रूपाने जाहीर संदेश दिला.
महाराजांना स्वतःसाठी मंदिर बांधण्याची इच्छा नव्हती. तर त्यांना भारत देशातील शेतकरी समृद्ध करावयाचा होता, हे त्यांच्या लीखाना द्वारे स्पष्ट आहे. राज्य व केंद्र शासनातील राज्यकर्ते हे शेतकरी हिताची धोरणे न राबविता, अनुदानाची गंगाजळी आणून अखिल भा.गुरुदेव संचालक मंडळाचे सांत्वन करते. परंतु राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत सांगितलेल्या प्रमाणे शेतकरी हिताचे कायदे करून, शेतकरी सुखी करावा हे मात्र शासन कधीच करीत नाही? म्हणून राज्य व केंद्र शासनातील राज्यकर्त्यांना व सत्ताधीशांना, आमदार-खासदार ,मंत्र्यांना, तुकडोजी महाराजांच्या पादुका वर मस्तक ठेवायची सुद्धा लायकी राहिली नाही ? हे लोकप्रतिनिधी नसून, पक्ष प्रतिनिधी आहेत.हे पक्षप्रतिनिधी शेतकरी व्यवस्थेच्या आजपर्यंत विरुद्ध वागले असून तरी त्यांचाच आपण उदो उदो करायला बाहेर निघालो. राज्यकर्ते हेच खरे शेतकरी विरोधी धोरणे राबवित आलेले आहेत .’सरकारचे धोरण ,हेच शेतकऱ्यांचे मरण .
अशा पवित्र तीर्थस्थळाचे जतन करण्यासाठी, संचालक मंडळांला विनंती की, त्यांनी हे स्मारक न पाडता, इतर परिसराच्या ठिकाणी नवीन íबांधकाम करावे, तसेच भव्य अनुदान आणून राष्ट्रसंतांच्या नावे जागतिक संस्कृती केंद्र उभारावे. राज्य व केंद्र सरकार हे राष्ट्रसंतांचा पुतळा पूर्ण सोन्याचा सुद्धा बांधून देण्यासाठी तयार होईल? त्यासाठी सरकारी खजिन्यात काहीही पैश्याची कमतरता नाही, परंतु ग्रामगीतेत लिहिल्या प्रमाणे शेतकऱ्याला सुखी करण्यासाठी मात्र आजपर्यंतचे कोणतेही सरकार ने शेतकरी विरोधी कायदे रद्द केलेले नाही.
स्मारकाची डागडुजी दुरुस्ती करण्याचे अधिकार संचालक मंडळाला जरूर असेल मात्र शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नये.अशी माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरूकुंज स्मारक बचाव कृती समितीचे भारत महाराज ठाकरे व शेतकरी संघटना, विदर्भ प्रमुख धनंजय पाटील काकडे, यांनी या पत्रकाद्वारे इतर संबंधितांना दिली आहे.
त्यानिमित्ताने खालील ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
1) कार्यक्रमाचे ठिकाण –
श्री समर्थ आडकूजी महाराज संस्थान वरखेड, तालुका- तिवसा, जिल्हा- अमरावती.(नागपूर रोड)
2) दिनांक- 10 ऑक्टोबर 2021, रविवार
3) वेळ – दुपारी- 12 ते 5.
प्रमुख पाहुणे –
१)शेतकऱ्यांचे कैवारी- श्री रघुनाथ दादा पाटील
( राष्ट्रीय अध्यक्ष. शेतकरी संघटना. )
२)श्री गुलाबराव गावंडे (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.)
३)श्री महंत राजधर वायनदेशकर महाराज (गोविंद प्रभु संस्थान,रिद्धपूर.
४) हेमंतजी काळमेंघ. (संचालक-शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती.)
प्रमुख वक्ते-
१)श्री कालिदासजी आपेट
(कार्याध्यक्ष , शेतकरी संघटना. महाराष्ट्र)
२)श्री धनंजय पाटील काकडे
( विदर्भ प्रमुख,. शेतकरी संघटना.)
३)श्रीमती कवियत्री संजीवनीताई प्र. काळे
( महिला आघाडी प्रमुख, अमरावती)
४) श्री अरुण महाराज बुरघाटे( अध्यक्ष, विश्व वारकरी सेना.)
५) श्री सारंग दाभेकर (गुरुदेव मंडळ, चिमूर)
६) श्री जनार्दनजी पाटील मगर, हिंगोली.
(जिवन प्रचारक अ.भा. गुरुदेव सेवा मंडळ, गूरुकुंज)
७) श्री अशोकराव यावले (अध्यक्ष, गुरुदेव सेवा आश्रम नागपूर)
८) श्री रुपरावजी वाघ.
( माजी,उपसेवा सर्वधिकारी ,अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ . गुरुकुंज
९) श्री ज्ञानेश्वरजी रक्षक (ग्रामगीता प्रचारक,नागपूर)
१०) श्री डार्वीन कोब्रा, संस्थापक अध्यक्ष ( भारतीय क्रांतिकारी संघटना )
१) सूत्रसंचालन-
भारत महाराज ठाकरे अडगाव. तालुका- मोर्शी.
२) प्रास्ताविक भाषण –
श्री भैयाजी बोके. वरखेड, तालुका- तिवसा
३) आभार प्रदर्शन –
श्री आनंदरावजी बोके वरखेड, ता. तिवसा
स्वागत समिती- श्री मिलिंद तायडे, शिराळा(संचालक, कृ. उ. बा. समिती ,अमरावती ), राजूभाऊ देशमुख( शेतकरी संघटना वरखेड),संदीप भाऊ रोडे मोर्शी. श्री, नंदेश अंबाडकर (अध्यक्ष, क्रांती ज्योती ब्रिगेड), दिनेशजी कानोन दादा., कैलास भोयर चिमूर, संजय पाटील पुंड, पोरगव्हान, विनोद पाटील पुंड, भीमराव कोरडकर देवरा, तुषार खवले यावली शहीद, बंडू ठाकरे विष्नोरा, प्रभाकरराव घाटोळे वाडेगाव. वरूड.,श्री अभिजीत दादा बोके, वरखेड., दीपक कथे, शेतकरी संघटना. पुरुषोत्तम धोटे कापुसतळणी. शेतकरी संघटना.
आपले विनीत —
भूषण कांडलकर यावली, योगेश निंभोरकर नर्सिंगपुर, विजय चोरे सावंगी जिजकार, प्रदीप हेनोडे सुरुळी.
सुदाम सोनारे सुरळी., बाबाराव देशमुख चांदस वाठोडा, गजाननमहाराज वानखडे, (सुरळी वरूड,). माधवराव रेखे अमरावती, रंगराव भाऊ लांबटकर (खर वाडी.)
योगेश पवार वाठोंडा. प्रफुल दादा तळेगाव, सनके दादा वडली, रमेशदादा बोके वरखेड.तिवसा, अभिनय काळे शिराळा, राहुल देवघरे तळेगाव, गजानन ठाकरे गोंदो डा. विजयाताई वाढणकर वरहा, सरला ताई सपकाळ अमरावती, माधुरीताई चेटुले तळेगाव ठाकूर, जगन कोल्हे, श्री विलास भोयर, श्री जगन कोल्हे, श्री घोंगडे महाराज, लक्ष्मण जी देशमुख, अनीलजी लांजुळकर देवरी अकोट, प्रदीप दादा बोके वरखेड. दयाराम कन्नाके, सिताराम देशमुख लाखापुर, अविनाश वानखडे, श्री लाखे दादा नागपूर, रजुमन लांडे चंद्रपूर. पुरुषोत्तम दादा कसबेगव्हाण., गोपाल परतेकी, तळेगाव ठाकूर, भीमराव चव्हाण गुरुदेव नगर.सागर भवते, व इतर गुरुदेव भक्त मंडळी.
संयोजक
१) वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज स्मारक बचाव कृती समिती.
२) शेतकरी संघटना, विदर्भ प्रदेश.
३)वरखेड ,(तालुका तिवसा) ग्रामवाशी बंधू आणि भगिनी .
४) राष्ट्रसंत प्रबोधन युवा-युवती आघाडी.
व इतर सामाजिक कार्यकर्ते.
सूचना -हे पत्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, ही नम्र विनंती.