डॉक्टर जितीन वंजारे सन्मानीत

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक २१/१०/२०२१ ला खालापूरी येथील वाघजाई देवी च्या पावन भूमीत जत्रेनिमित्त गेलो असता सन्माननीय राजेश उगले सर याच्या मित्रमंडळ व बंधूजणांनी देवीचा नारळ देऊन यथार्त सत्कार केला.यावेळी राजेश उगले ,संजूबाप्पू उगले ,विनायक गवळी ,मंदिर विश्वासूं विठ्ठलतात्या उगले,सखाजिजा,शिवराजे उगले,उत्तम उगले ,राजेंद्र उगले ,विजय उगले,परजने बंधू सह अनेक जण उपस्थित होते.अगदी मोठ्या उत्साहात वाघजाई देवी यात्रा संपन्न झाली ,यावेळी मंदिर प्रशासना कडून गोड जेवणाची पंगत देण्यात आली होती.यावेळी डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी मंदिर परिसराची पाहणी केली आणी भविष्यात मंदिर स्वयंपूर्ण करण्याचा सर्वोतोपरी सार्वजनिक प्रयत्न करण्याचाही निर्णय झाला.विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून मिळालेल्या सभागृहाचे लवकरच काम करून देवी परिसर सुशोभीकरण होणार आहे या कामात योग्य लक्ष घालून दर्जेदार काम करून घेऊ अशी ग्वाही सामाजिक कार्यकर्ते मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिली.