ताज्या घडामोडी

जिल्ह्यातील वर्ग १ ते वर्ग ३ पर्यंतची रिक्त पदे भरण्यासाठी जि.प. अध्यक्ष यांचे राज्यपाल यांना निवेदन

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

गडचिरोली जिल्हा हा अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल असून जिल्हयात वर्ग १ ते ३ ची पदे बऱ्याच प्रमाणात रिक्त आहेत. सदर रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
गडचिरोली जिल्हयामध्ये वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी येण्यास तयार नसतात त्या कारणाने या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात रिक्त पदे असून तथा वर्ग ३ ची पद भरती झालेली नसल्याने या ठिकाणी वर्ग ३ ची पदे बऱ्याच प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयीन तथा विकास कामे करण्यास अडचन निर्माण होत आहे. करीता गडचिरोली जिल्हयातील वर्ग १ ते वर्ग ३ पर्यंतची सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवेदनातून केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close