ताज्या घडामोडी

नेरी येथे खावटीकिट वाटप कार्यक्रम संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी : रामचंद्र कामडी नेरी

सध्या कोरोना संकट असून या काळात प्रशासन किंवा सामाजिक संघटन च्या माध्यमातून मदतीचा ओघ आदिवासी लाभार्थ्यांना पोहचविण्याचे कार्य सुरू आहे . आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रात 12500 खावटी कीट वाटप करण्यात येत असून आदिवासी लाभार्थ्यांना दोन हजार रुपये अनुदान खात्यात जमा होणार आहे .याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणू नेरी येथील ग्रामपंचायत सभागृहांत खावटि किट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.त्यात १४२आदिवासी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला.हा कार्यक्रम आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य सहकारी विकास महामंडळ मर्यादित नाशिक, उपप्रादेशिक कार्यालय चिमुर व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चिमुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी रेखा नानाजी पिसे (सरपंच ग्रामपंचायत नेरी), डॉक्टर शामजी हटवावे(महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य),माया नन्नावरे (महिला भाजपा तालुकाध्यक्ष),राजुपाटिल झाडे(भाजपा तालुकाध्यक्ष), संदिप पिसे (ग्रामपंचायत सदस्य),पिंटु खाटिक (ग्रामपंचायत सदस्य), व हरीशचंद हटवार(आदिवासी आश्रमशाळा मुख्याध्यापक पळसगाव), नरेंद्र पंधरे(भाजपा शहर प्रमुख नेरी), रमेश कंचरलावार)व इतर सर्व पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close