तहसिलदार व नायब तहसिलदारांचे चंद्रपूरात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू
आंदोलनाला मिळाला उत्स्फुर्तंपणे प्रतिसाद !
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग-२ यांचे ग्रेड पे च्या मागणी संदर्भात आज सोमवार दि.३एफ्रिल पासून महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनाला चंद्रपूर जिल्ह्यात १००टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.दरम्यान आज पासून सुरु झालेल्या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व नायब तहसिलदार सहभागी झाले आहे.संघटनेच्या वतीने स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय समोर उभारलेल्या मंडपात चंद्रपूर जिल्ह्यातील उपरोक्त अधिकारी आपल्या रास्त मागण्यांसाठी आपले शासकीय कामकाज बंद ठेवून बसले असल्याचे आज दिसून आले. राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार, राजपत्रित वर्ग-२हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे.परंतू नायब तहसिलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग -२चे नसल्याने यांचे ग्रेड पे वाढविण्या संदर्भात राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना यांनी वारंवार शासनस्तरावर पाठपुरावा केला.पण शासनाने यांचे रास्त मागणीची दखल न घेतल्यामुळे शेवटी महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेला बेमुदत कामबंद आंदोलनाचे नाईलाजास्तव हत्यार उपसावे लागले.आजच्या या कामबंद आंदोलनामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय कामकाजांवर विपरित परिणाम पडला हे मात्र तेव्हढेच खरे आहे.सुरु झालेल्या या आंदोलनात तहसिलदार व नायब तहसिलदार उतरले असून आंदोलनात प्रामुख्याने सचिन खंडाळे ,राजू धांडे , सुभाष चव्हाण,दिलीप गोडशेलवार , जितेन्द्र गादेवार ,सचिन पाटील,लोकेश्वर गभणे , ओंकार ठाकरे,डी.आर.भगत , चंद्रशेखर तेलंग , महेन्द्र फुलझेले, उल्हास लोखंडे , निवृत्ती उईके,साधना धकाते,गिता सुनिल उत्तरवार ,प्रिती डुडुलकर,अनिकेत सोनवणे, डॉ.कांचन गणेश जगताप ,अतुल गांगुर्डे, विनोद डोणगांवकर,संजय चिंगलवार, ज्योति कुचनकर ,संदीप चांदेकर , राजेन्द्र मंथनवार ,सागर कांबळे ,प्रविण चिडे,रश्मी बाब्बर ,मलिक पठाण,मनोहर चव्हाण,पी.एच.शिल , संदीप भांगरे , मनोज रामटेके, मधुकर काळे,टी.डब्लु .कोवे ,सतिश साळवे ,आदींची उपस्थिती आज दिसून आली.जो पर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तो पर्यंत हे आंदोलन असेच सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने केला आहे.