ताज्या घडामोडी
युवा नेते अशिद मेश्राम यांचे उपोषणाला रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक -अध्यक्ष महेश हजारे देणार येत्या शनिवारी भेट
प्रतिनिधीः रामचंद्र कामडी
काग मुक्कामी रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे युवा नेते चिमूर तालूका प्रमुख अशिद अमरदिप मेश्राम यांनी गांव पातळीवरील रास्त मागण्यांबाबत दि.१९फेब्रूवारी पासून लाक्षणिक उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाचा ४था दिवस आहे.दरम्यान या उपोषणाला चंद्रपूर जिल्हा रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे हे येत्या शनिवारी भेट देवून या आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार असल्याचे हजारे यांनी आज संध्याकाळी या प्रतिनिधीशी चंद्रपूर मुक्कामी बोलताना सांगितले. काल काँग्रेसचे दिग्गज नेते डाॅ. सतिश वारजुकर व रोशन ढोक यांनी उपोषण मंडपाला भेट देत मेश्राम यांच्याशी मागण्या संदर्भात चर्चा केली.