ताज्या घडामोडी

एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला आदिवासी विद्यार्थी संघटनेचा पाठिंबा

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

बोरी-:राज्य परिवहन मंडळाची आर्थिक घडी तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे वाढत्या आत्महत्या प्रलंबित महागाई भत्ता अशा अनेक मागण्यासाठी महामंडळ कामगार संघटनांनी राज्यभरात बेमुदत संपाला गेल्या अनेक दिवसांपासून सुरुवात केली आहे.

यातच एसटी कर्मचारी आंदोलनाची दखल घेत आदिवासी विद्यार्थी संघटनेच्यावतीने सदर संपाला पाठिंबा जाहीर करण्यात आला तसेच शासनाने एसटी महामंडळाला महाराष्ट्र शासनमध्ये विलीनीकरण करण्यात यावे आदी मागण्या शासनाकडे आदिवासी विद्यार्थी संघटनेचावतीने करण्यात आले.तसेच आदिवासी विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सह माजी सरपंच विजय कुसनाके, दिलीप गंजीवार , सामाजिक कार्यकर्ते जुलेख शेख, महेश सडमेक, संदीप बडगे,आदींनी उपोषण कर्त्या एसटी कर्मचाऱ्यांसोबत त्यांचा मागण्या बाबत चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्यावर उपोषणाला समर्थन जाहीर केले.एसटी कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करीत आहे या आंदोलना मुळे समस्त एसटी मार्फत प्रवास करणारे शाळेकरी विद्यार्थी, शेतकरी, वृद्ध व कामगार वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच या संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे कुटूंब सुद्धा उघड्यावर आले आहेत याकरीता महाराष्ट्र शासनाने सकारात्मक विचार करून एसटी महामंडळाला महाराष्ट्र सरकार मध्ये विलीन करुन आंदोलनाला बंद करीत सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी करीत संपाला पाठिंबा जाहीर करण्यात आला यावेळी राज्य परिवहन महामंडळ अहेरी आगाराचे चालक,वाहक व यांत्रीक यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यगण उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close