ताज्या घडामोडी

२०२४ ला वंचितांसाठी नव्या युगाचा नवा प्रकाश उदयास येणार -जिल्हा संघटक प्रशिक सम्राट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

डुकरी पिंपरी ता जी जालना येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन जालना तालुकाध्यक्ष भानुदास साळवे यांच्या हस्ते व जिल्हा महासचिव प्रा संतोष आढाव जालना तालुका महासचिव वैभव वानखेडे जिल्हा संघटक प्रशिक सम्राट यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात करण्यात आले .
यावेळी प्रा संतोष आढाव हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचे सर्वच कार्यकर्ते यांनी कुठल्याही प्रकारच्या आमिषाला किंवा मानपानाला महत्त्व न देता बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करण्याची गरज आहे. अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षाची जबाबदारी वाढली असून त्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना मित्रपक्ष मिळवून युती करण्यात आली यावेळी अकोला पॅटर्न राबवण्याची ही लढाई जिंकायची आहे.असे तें म्हणाले.
ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडीच्या शाखांची गरज आहे त्यामुळे ग्रामीण भागात किमान एका पदाधिकाऱ्यांनी ५ शाखाची निर्मिती करावी त्यामुळे कार्यकर्त्यांची ताकत वाढल्यास निश्चितच पणे वंचित बहुजन आघाडीला सोन्याचे दिवस येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यासाठी कार्यकारिणीत फेरबदल करण्याची गरज नाहीं असे प्रतिपादन त्यांनी डुकरी पिपरी येथे वंचित आघाडीच्या नामफलकाचे उद्घाटन करते वेळी प्रा. संतोष आढाव बोलत होते.
यावेळी जिल्हा संघटक प्रशिक सम्राट म्हणाले की २०२४ च्या निवडणुकी कडे संपूर्ण राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
वंचित बहुजन आघाडीचें स्तंभ आमचे मार्गदर्शक ऍड प्रकाश आंबेडकर साहेब यांनी स्थापन केलेला एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधान आंबेडकरवादी. धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी प्रणालीची असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय नेत्या बरोबर यांचे चांगले संबध आहेत. २४ मार्च २०१९ ला वंचित बहुजन आघाडीची भारतातील ‘राजकीय प्रमुख पक्ष म्हणून नोंदणी झाली. त्यामुळे अनेक सामाजिक संघटना वंचित बहुजन आघाडी सोबत येण्यासाठी सहभागी झाल्या या पक्षाने एआयएमआयएम पक्षांसह १७ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा युतीने लढवल्या, होत्या त्यामध्ये एका जागेवर एआयएमआयएम चा उमेदवार उभा होता इतर ४७ जागांवर बहुजन आघाडीचे उमेदवार उभे होते. या युतीतील, एकमेव एआयएमआयएम पक्षाचा उमेदवार इम्तियाज विजय झालें वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण ४७ उमेदवार पराभूत झाले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडी व एआयएमआयएम ने एकत्रित निवडणूक लढवली होती परिणाम स्वरूप युतीला ७.६४% मते मिळवली होती यावेळेस २०२४ ला त्याहीपेक्षा आपली ताकद दाखवायची आहे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागले पाहिजे. २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजय होतील. २०२४ ला वंचितांसाठी नव्या युगाचा नवा प्रकाश उदयास येणार अशी आशा जिल्हा संघटक प्रशिक सम्राट यांनी व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडीचें तालुका महासचिव वैभव वानखेडे म्हणाले की ज्याप्रमाणे अकोला पॅटर्न सिद्ध करून दाखवलें त्याच प्रमाणे येणाऱ्या २०२४ ला नंदापुर पॅटन विजयी करून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना मित्रपक्ष मिळवून अकोला पॅटर्न राबवण्याची ही लढाई जिंकायची आहे. महानगरपालिका ग्रामपंचायत नगर परिषद विधानसभा लोकसभा यासाठी महाराष्ट्रात आमची तयारी झाली आहे. वैभव वानखेडे पुढे म्हणाले की जी क्रांती आम्ही नंदापुरात घडवून आणली, तीच क्रांती संपूर्ण देशांमध्ये राबविन्यात येणार.
वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्ह्याचे डेव्हिड घुमारे हे वंचितचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील कणखर नेतृत्वादी भ्रष्टाचार मुक्त नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा पक्ष महत्त्वाचा ठरणार आहे.
या देशाचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एड प्रकाश आंबेडकर यांनी वंचित मध्ये एस सी एस टी ओ बी सी च्या नेत्यांना सत्तेच्या प्रवाहामध्ये सामील केले. त्यामुळे आज एड प्रकाश आंबेडकराला मानणारा मोठा वर्ग भारतामध्ये कार्यरत आहे.
यां देशाच्या राजकारणामध्ये सत्तेपासून दूर राहिलेल्या वंचितांला सत्तेच्या प्रवाहामध्ये आणलें समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी एड प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती केली विशेष करून राष्ट्रीय पक्षांमध्ये वंचितचें स्थान कायम ठेवण्यासाठी मागील काही वर्षाच्या पासून प्रकाश आंबेडकर साहेबांना अनेक कठीण परिस्थितीतून जावे लागले. तरी तें आपल्या ध्येय आणि विचारापासून दूर झाले नाही. यांनी देशहिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीच्या आधारे संपूर्ण देशाच्या विकासाचा आराखडा वंचित शिवसेनेने तयार केला असून त्यामुळे वंचित चा विजय निश्चित होणार आहे. अशी आशा वैभव वानखडे यांनी व्यक्त केली.
जालना तालुका अध्यक्ष भानुदास साळवे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण करताना म्हणाले कि येणाऱ्या काळात बहुजनांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीची येणाऱ्या निवडणूकात सत्ता परिवर्तन चे साक्षीदार व्हा
या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे शाखा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close