पोलिस निवडणूक निरीक्षक यांची पाथरी येथे भेट
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.3 नोव्हेंबर रविवार रोजी पोलीस निवडणूक निरीक्षक श्री राजेश दुग्गल (आयपीएस)यांनी पाथरी येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे भेट दिली असता त्यांचे स्वागत 98 पाथरी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री शैलेश लाहोटी यांनी केले.पोलिस निवडणूक निरीक्षक यांनी 98 पाथरी विधानसभा मतदार संघातील संवेदनशील असलेल्या शेवडी जहांगीर येथील मतदान केंद्राची पाहणी केली तसेच आय टी आय पाथरी येथील स्टोंगरूम,मतमोजणी कक्षाची पाहणी केली व पोलिस बंदोबस्त,कायदा सुव्यवस्था बाबत केलेल्या उपाययोजना बाबत आढावा घेऊन महत्त्वपूर्ण सूचना केल्या यावेळी त्यांच्या सोबत पोलीस उपविभागीय अधिकारी श्री जीवन बेनिवाल,98 पाथरी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी श्री शैलेश लाहोटी,तहसीलदार पाथरी श्री शंकर एन.हांदेशवार,तहसीलदार सोनपेठ श्री सुनील कावरखे, मुख्याधिकारी पाथरी श्री तुकाराम कदम,पोलीस निरीक्षक पाथरी श्री जगदीश मंडलवार इत्यादी उपस्थित होते .