शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे जिल्हास्तरीय बॉक्स लंगडी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक 16 सप्टेंबर 2022 शुक्रवार रोजी शांताबाई नखाते विद्यालय शिवाजीनगर पाथरी तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे जिल्हास्तरीय बॉक्स लंगडी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन सकाळी 10:00 वाजता करण्यात आले आहे . या स्पर्धेमध्ये बारा वर्षा आतील मुले/ मुली यांचा बारा खेळाडूंचा संघ असेल तर खुल्या गटासाठी वयाची अट नाही. खुल्या गटातून पुरुष व महिला प्रत्येकी संघात बारा खेळाडू असावेत. वरील स्पर्धेतील सहभागी खेळाडूंमधून सर्वोत्कृष्ट खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. दिनांक 24 सप्टेंबर व 25 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे राज्यस्तरीय बॉक्स लंगडी असोसिएशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे, या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा संघ सहभागी होणार आहे. परभणी जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशनचे अध्यक्ष मा. अजिंक्य भैय्या नखाते व सचिव भरत घाडगे यांनी परभणी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील बॉक्स लंगडी संघांनी या निवड चाचणी स्पर्धे मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. संघासोबत संघ व्यवस्थापक शिक्षकांनी उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी 9527036017 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.