ताज्या घडामोडी

एक धाव सुरक्षेची’ आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत महा मॅरेथॉन रॅली संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी दि. 12 /0/2024 ला राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित वसंतराव नाईक मराठवाडा कृषी वि‌द्यापीठ येथे एक धाव सुरक्षेची आणि हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत महा मॅरेथॉन रॅलीस जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रघुनाथ गावडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात सर्वांनी प्राधान्याने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, शिक्षणाधिकारी (मा.) श्रीमती आशा गरुड, श्री शिवाजी महावि‌द्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस.एन. केश‌ट्टी, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. मोरे, एनसीसी विभागाचे कॅप्टन प्रशांत सराफ, आपती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके तसेच इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.

मॅरेथॉन रॅली मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, सैनिकी शाळा, सारंग स्वामी वि‌द्यालय, श्री. शिवाजी महावि‌द्यालय परभणी अंतर्गत असलेले एनसीसी कॅडेट, जिल्हा रुग्णालय, परभणी येथील वैद्यकीय पथक, एएनएम, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे अधिनस्त खेळाडू आणि आपदा मित्र याप्रमाणे एकुण 450 विविध स्पर्धकांनी भाग घेलला. सदर मॅरेथॉन रॅलीमध्ये मुलींमधून श्री सारंग स्वागी वि‌द्यालयाच्या इयत्ता 8 वी वर्गातील कु.भाग्यश्री जाधव प्रथम, कु. श्रद्धा मांडे द्वितीय, कु. सस्कृती मांडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर मुलांमधुन करण रामा बल्लाळ-प्रथम, वैभव बालाजी तरंगे-‌द्वितीय, आणि प्रदीप बाबुराव चव्हाण तृतीय हे विजेते ठरले. इतर सहभागी स्पर्धकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहभागी प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close