क्रांतीसुर्य तू शिल्पकार तू बोधिसत्व तू मूकनायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यातेजा माझे भिमराया
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
महामानवास अभिवादन करण्यासाठी आज राष्ट्रवादी भवन येथून आमदार बाबाजानी दुर्रानी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन रॅली निघाली. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सर्वधर्मीय जयंती समिती पाथरी च्या वतीने आयोजित आजच्या अभिवादन रॅली मध्ये, सर्व धर्मीयांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.पाथरी शहरात प्रथमच हा सामाजिक एकेतेचा यशस्वी प्रयोग करण्यात आला.
सकाळी राष्ट्रवादी भवन येथे सुरू असलेले भीमगीत ऐकून अनेक नागरिक आनंदून गेले . आमदार बाबाजानी दुर्रानी साहेब यांच्या आगमनानंतर राष्ट्रवादी भवन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ढोल ताशाच्या गजरात अभिवादन रॅली निघाली.उपाजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी साहेब यांनी मोठ्या उत्साहाने रॅली मध्ये सहभाग घेतला .
यावेळी जयंती उत्सव समितीच्या वतीने मान्यवरांना फेटे घालण्यात आले होते. निळ्या रंगांचे फेटे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.जय भीम चा जयघोष करत निघालेली अभिवादन रॅली ची सांगता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने यावेळी आमदार बाबाजानी दुर्रानी साहेब व उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आजच्या जयंती मध्ये पाथरी शहरातील सर्व सर्वधर्मीय,राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग घेऊन एक वेगळा वेगळा आदर्श समजापुढे ठेवला .
सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व धर्मीय जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री.अलोक चौधरी( नगरसेवक पाथरी) ,स्वागताध्यक्ष श्री.सुरेश बप्पा ढगे (शिवसेना जिल्हा प्रमुख )सचिव श्री.विश्वनाथराव थोरे ( तालुका अध्यक्ष काँग्रेस ) कार्याध्यक्ष श्री.रवींद्र धर्मे (शिवसेना नेते )सहसचिव श्री.खाजा अन्सारी (ऊर्दू शिक्षक संघटना) , कोषाध्यक्ष श्री.राम घटे (शिक्षक संघटना उपाध्यक्ष ) उपाध्यक्ष श्री.सचिन नीलवर्ण (पंजाबराव शिक्षक संघटना) सल्लागार,जेष्ठ नेते श्री.प्रल्हाद नाना चिंचाणे यांनी परिश्रम घेतले.