निवळी पुल वाहातुकी साठी धोकादायक;संपुर्ण पुलाला पडली भेग जागोजागी भगदाड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी:-तालुक्यातील वडी-निवळी मार्गावर असलेल्या नदी वरील पुल पुराच्या पाण्याने घासून गेला असुन जागाेजागी मोठमोठे भगदाड पडले असून पुलाला मधोमध तडा गेला असून हा पुल वाहतुकी साठी धोकादायक झाला आहे.
या वर्षी सप्टेबर महिण्या चार पाच वेळा अतिवृष्टी झाल्याने नदी नाले मर्यादा सोडून वाहीले यात शेती सह रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान झाले आहे त्यातच जे सिमेंट नळ्या बसऊन तीस चाळीस वर्षा पुर्वी तयार केलेले पुल आता मोडकळीस आलेले आहेत. त्यातच या वर्षी पुराच्या पाण्याने या पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. निवळी येथे जाण्या साठी वडी या गावा हून एक मेव रस्ता आहे.निवळी गावच्या दक्षिणेला गोदावरी नदी असल्याने याच मार्गाचा वापर ग्रामस्थांना ये जा करण्या साठी बाराही महिणे उपयोगी पडतो. पावसाळ्यात नदिला पुर आला की ग्रामस्थांना गावच्या चारी बाजुंनी पाण्याचा वेढा पडतो त्या मुळे गावच्या बाहेर पडता येत नाही. या वर्षी अशी परिसथिती निवळी ग्रामस्थांनी अनेकवेळा अनुभवली. गावात येण्या साठी च्या रस्त्यावरील पुल संपुर्णत:खचला असून पुलाला मोठी भेग पडली आहे.तर अनेक ठिकाणी मोठ मोठे भगदाड पडलेले आहेत. अशीच परीस्थिती वडी हुन निवळी,पाटोदा,गोपेगाव, मरडसगाव या गावांना जोडणा-या पुलाची झाली आहे नदिला पुर आला की या गावांचा इतर गावांशी किंवा तालुक्याशी संपर्क तुटतो. त्या मुळे या दोन्ही पुलांची उंची वाढऊन नविन काम होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत या पुलावरुन जिव मुठित धरून वाहनचालक मोठी कसरत करत आपली वाहाने पुलावरून बाहेर काढत आहेत. संबंधीत विभागाने या पुलाचे तात्काळ ऑडिट करून हा पुल नव्याने बांधावा अशी मागणी ग्रामस्थां मधून होत आहे.