गांव ठान जागेवर ठेवलेले महीलेचे साहित्य जेसीबी ने फेकले

प्रतिनिधी:संजय नागदेवे तिरोडा
जेसीबीच्या सहाय्याने गावठाण गाईचारणया खुल्या जागेवर ठेवलेले महिलेचे अनेक साहित्य गाम पंचायत सरपंचा.रोजगार सेवक. उपसंरपंच .आणि सदस्या यांनी सदर महीलेला काही नोटिस किंवा सूचना न देता एकाएकी जेसीबी घेऊन जाऊन तेथील साहित्य फेकण्याचे काम सुरु करून त्या महिलेने विचारणा केली असता तिला अश्लील शिविगाळ करून तिला मारपीट केल्या चे सपष्ट झाले आहे. व नंतर महिलेने तिरोडा येथे जाऊन पोलीसांत रिपोर्ट दाखल करून चार लोकानं गुन्हा दाखल करण्यात आले .परंतु महिलेला काही न सुचता ती जागा वनविभागांची असल्याचे सांगण्यात माञ ती एका मालकीची असुन गावठाण मधे गाईचारणया साठी आखर असल्याचे उघड कीस आले .

वृत्त असे की तिरोडा तालुक्यातील गाम मनोरा येथील पेमलता विजय तिडके वय46 वषे या महिलेने घरासमोरील गाव ठाण आखरवर खुल्या जागेत आपले अनेक साहित्य ठेवले होते .परंतु गावातील सरपंच. उपसंरपंच. रोजगार सेवक. व सदस्या. अशा चौघानी त्या ना काही सुचना .न देता जेसीबी ने तात्काळ साहित्य फेकण्यात आले .त्यात त्या महिलेचे एक लाख बतीस हजार रुपयांचे नुकसान झाले.
गामपंचायतीने कोणत्याही प्रकारची सुचना न देता साहित्य फेकण्याचे कृत्य केल्याने पेमलता विजय तिडके यानी सरपंच उपसंरपंच याना विचारणा केली असता त्यावेळी त्याना अश्लील शिविगाळ करुन मारहाण केली ही घटना 7 मार्च सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. यासंदर्भात आरोपी सरपंच ललिता नरेंद्र मारवाडे 42 वर्ष .रोजगार सेवक लिलाधर केशवराव तिडके 48 वर्ष. उपसंरपंच रवि पकाश गणवीर 35 वर्ष. व चंद्रकला मेसराम 30 वर्ष .सर्व रा.मनोरा यांच्यावर भादवि कलम 323.294.427.504.506.4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर साहित्य ठेवलेली जागा दामसिग बकाराम सिंग पारबताबाई अशा गाव ठाण नमुना 8 वर नोंद आहे व ती त्या ची मालकीची असुन त्यानी गाई चरासाठी दान देण्यात आली असे सपष्ट नोद आह .