सिकलसेल आजारावर समुपदेशन हि काळाची गरज
ग्रामीण प्रतिसीधी:रामचंद्र कामडी नेरी
सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम सप्ताहा दरम्यान जिल्हा परिषद आरोग्य विभाग चंद्रपूर, सर्वोदय युवा विकास संस्था चिमूर तथा ग्रामीण रुग्णालय कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथे जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सिकलसेल आजारांवर समुपदेशन करण्यात. या कार्यक्रमात सर्वोदय विकास संस्था चिमूर चे तालुका पर्यवेक्षक हनुमान सुरपाम यांनी सिकलसेल आजारावर सविस्तर माहिती देऊन सर्व विद्यार्थी गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक वर्ग उपस्थित सर्व शालेय कर्मचारी यांना समुपदेशन करताना तालुका पर्यवेक्षक यांनी सिकलसेल हा अनुवंशिक आजार असल्यामुळे विवाह पूर्व तपासणी करूनच विवाह करावा जेणे करून आपल्या कुटुंबांमध्ये पुढील पिढितआजार येणार नाही पर्यायाने या आजाराचे उच्चाटन होण्यास मदत होईल. गरोदर मातांनी तसेच त्यांच्या जोडीदारांनी सुद्धा सिकलसेल आजाराची तपासनी करुन घ्यावी. यात सकारात्मक आढळून आल्यास गर्भजल परीक्षण करूनच बाळाला जन्म द्यावा अश्या प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले व त्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.राऊत , एस.आर.डोहे, एम.पी.जिवतोडे, आर.एच.चौधरी ,एच.के.तेलंग, एल.आर.मडावी, एस.एन.मनवर तसेच सर्व कर्मचारी , गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.