ताज्या घडामोडी

चिंचोली बनावट शेतजमीन विक्री प्रकरणा बाबत पुंडलिकराव गोठेंची राज्याचे मुख्यमंत्री, महसूल आयुक्त व वंदेमातरम् कडे तक्रार दाखल

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चंद्रपूर तालुक्याच्या पदमापूर साज्यातील चिंचोली येथील एका शेतजमीनीची बनावट कागदपत्रे तयार करून दलाल दिलीप राजगूरे यांनी चक्क विधवा आदिवासी महिला जैनाबाई दामोधर पेंदाम यांची फसवणूक केलेली आहे.या दलालावर तातडीने पोलिस कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पुंडलिकराव गोठे यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना एक लेखी निवेदन देवून या पूर्वीच केली आहे.तदवतंच या तक्रारीची एक प्रत चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे कडे सादर केली आहे.दोन दिवसां पूर्वि त्यांनी परत या प्रकरणाची सविस्तर तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल आयुक्त नागपूर या शिवाय वंदेमातरम् या नव्याने अस्तित्वात आलेल्या तक्रार केन्द्राकडे केली असल्याचे त्यांनी आज रविवारी चंद्रपूर मुक्कामी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

दरम्यान आपचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे यांनी हे प्रकरण सर्वप्रथम उघडकिस आणले होते. त्या नंतर सतत त्यांनी या प्रकरणा बाबतचा पाठपुरावा केला होता. परंतु खोटे कागदपत्र तयार करून शेतीची विक्री करणा-या दलालावर अद्याप कारवाई झालेली नाही. अश्या प्रकरणावर आळा घालण्यासाठी सदरहु दलालावर तातडीने कारवाई होणे आवश्यक व गरजेचे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.याच संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(रिपाई खोब्रागडे गट)लोकसभा अध्यक्ष पुंडलिकराव गोठे यांनी उपरोक्त प्रकरणा बाबत जिल्हास्तरीय पथक नेमून पदमापूर पटवारी दप्तरची तपासणी शिवाय उपरोक्त प्रकरणात योग्य ती चौकशी करण्याची मागणी करत दोषीं दलाल ,अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जो पर्यंत या प्रकरणात सखोल चौकशी होवून दोषींवर कारवाई होत नाही तो पर्यंत या बाबत सतत पाठपुरावा सुरू राहील असे पुंडलिकराव गोठे व सुनिल मुसळे यांचे म्हणणे आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close