वाघाळा येथे तरुण शेतक-याची आत्महत्या
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवार १२ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
सततची नापिकी आणि वडिलांच्या नावे असलेले बँकेचे कर्ज कसे फेडणार व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत तो महिणाभरा वावरत होता.पांडुरंग आश्रोबा राऊत वय ३७ असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आह या तरुणाने मंगळवार १२ जुलै रोजी मुलांचे संगोपन आणि कर्ज विवंचनेतून गळाफास घेऊन जिवन यात्रा संपवली. दिवभर पावसाची रिपरीप सुरू होती गोठ्यातील बैलांना चारापाणी करून गोठा साफ करून हा तरून पावसामध्ये भिजत घरी आला. यावेळी त्याची पत्नी पिठाच्या गिरणीवर दळण आणण्या साठी गेली होती .घरी परत आल्यावर पाहिले असता पांडुरंग राऊत यांनी घरातील पत्राखालील अडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले . पांडुरंग राऊत हामागील एक महिन्या पासून त्याच्या सहा अपत्यांचा उदरनिर्वाह कसा करावा वडिलांच्या नावे असलेले बँकेचे कर्ज कसे फेडावे, शेतात होणारी नापिकी याची चिंता करत होता. या याच काळजीत त्यांने आत्महत्या केली असल्याची फिर्याद पांडूरंगचा चुलत भाऊ दत्ता राऊत यांनी पाथरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दिली आहे .दिलेल्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असून रात्री उशिरा पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये मृतदेह शवविच्छेदन करून वाघाळा येथील वैकुठधाम स्मशानभुमी शोकाकूल वातावरणात त्याच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटने विषयी गावात हळहळ व्यक्त होत आहे.