खेर्डा महादेव येथे जगद्गुरु तुकाराम महाराज गुरु अनुग्रह दिना निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व शिवजन्मोस्तवाचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गुरु अनुग्रह दिनानिमित्त प्रसिद्ध भारुडकर श्री ह भ प त्रिंबक महाराज आमले यांनी दिनांक 14 फेब्रुवारी 2024 ते 21 फेब्रुवारी 2024 अखेर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे आणि या काळातच अखंड महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत असल्याने गावातील तरुणांनी यावर्षी शिवजन्मोत्सव या सप्ताहामध्येच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानिमित्त या सप्ताहातील दिनांक 19 फेब्रुवारी चे म्हणजेच शिवजयंतीचे विशेष किर्तन तीर्थपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री ह भ प योगेश महाराज गायके यांच्या कीर्तनाचे विशेष करून आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी सप्ताहाच्या प्रारंभपूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान टाकळगव्हाण येथील गुरुवर्य श्री ह भ प महामंडलेश्वर १००८ हरीशानंद महाराज यांचे शुभ हस्ते ग्रंथ पूजा करून सप्ताह प्रारंभ होईल त्यानंतर गावातून टाळ मृदंगच्या गजरात वारकरी दिंडी व ग्रंथ मिरवणूक होईल. नंतर श्री ह भ प संदिपान महाराज तौर व बद्रीनाथ महाराज तौर आणि गावकरी भजनी मंडळ यांच्या मार्गदर्शनात गाथा भजन होईल. त्यानंतर दुपारी एक ते पाच या वेळेत श्री ह भ प बबन देव महाराज केदारे गुरुजी यांच्या मंगल वाणीतून श्रीमद् भागवत कथा होईल. भागवत कथेनंतर श्री बळीरामजी शिंदे यांच्या वतीने महाप्रसाद होईल. सायंकाळी सहा ते सात या वेळेत हरिपाठ होईल.
या सप्ताहातील पहिले कीर्तन पुष्प श्री ह भ प संतोष महाराज केदारे हे गुंफतील तसेच या सप्ताहामध्ये श्री ह भ प अनंत महाराज पावडे, श्री ह भ प पंडित महाराज कुरे, श्री ह भ प सारंगधर महाराज रोडगे, श्री ह भ प नाना महाराज रत्नपारखी, श्री ह भ प योगेश महाराज गायके, श्री ह भ प राजाराम महाराज सूर्यवंशी यांची कीर्तने सुस्राव्य होतील. बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी श्री ह भ प अर्जुन महाराज मोटे पळशीकर यांचे काल्याचे किर्तन होईल, व नंतर काल्याचा महाप्रसाद होईल.
सप्ताहामध्ये उपस्थितीसाठी मराठ्यांचे हृदय स्थान संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांना आमंत्रित करण्यासाठी त्रिंबक महाराज आमले यांच्या वतीने दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी श्री विनायक आमले व प्रताप आमले हे क्रांती क्षेत्र अंतरवाली सराटी येथे आमंत्रण देण्यासाठी गेले होते. अशी माहिती श्री पवन आमले यांनी दिली.