दिव्यांग 5% निधी 100% वाटप न करणाऱ्या ग्रामसेवकांना वरदहस्त कोणाचा ?

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
माजलगाव तालुक्यात 91 ग्रामपंचायत असून यामध्ये काही ग्रामपंचायतीने शंभर टक्के निधी वाटप व खर्च केला नाही अपंग बांधवांचा हा त्यांच्या हक्काचा निधी असून कायद्यांमध्ये याची तरतूद केली आहे अपंग बांधवांना ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांच्या उत्पन्नातून 5% निधी वाटप करण्यासंदर्भात शासन निर्णय असून या निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे माजलगाव तालुक्यात 91 ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी अपंग बांधवांना 2016 ते 2021 मार्च अखेर 5% निधी हा 100% वाटप व खर्च केला नाही याप्रकरणी माजलगाव प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना अनेक वेळा निवेदन, आंदोलन, मोर्चे, उपोषण करूनही 100% निधी वाटप व खर्च केला गेला नाही मागील उपोषणाच्या वेळी लेखी स्वरूपात आठ दिवसात ग्रामसेवक यांच्या वर शिस्तभंगाची कारवाई अनुसरण्यात येईल अशी नोटीस ग्रामसेवक यांना काढून सुद्धा यामध्ये 100% निधी वाटप केला गेला नाही या मध्ये प्रशन निर्माण होतो की ग्रामसेवकांना शिस्तभंगाच्या कारवाई पासुन वाचविण्याचा वरदहस्त कोणाचा होत आहे असे निर्दशनास आले आहे त्यामुळे गटविकास अधिकारी, सहगटविकासअधिकारी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने ता अध्यक्ष गोपाळ पैंजणे व युवक ता अध्यक्ष भागवत डोईजड यांनी बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा अजित पवार साहेब यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.