मोटार सायकल चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
– चिमूर तालुक्यात मोटार सायकल चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून अशातच पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला केले गजाआड,
पोलीस स्टेशन भिसी यथे आज दिनांक.१४/०९/२०२२ ला अप क्र. 115/2022 कलम 380 IPC या गुन्हाच्या तपासा दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे आरोपी नामे 1) तौफिक रफिक शेख 2) जिशांत परवेज शेख 3) मासुम देवराव शेंडे 4) सौरव चंद्रशेखर वाघमारे सर्वजण राहणार शंकरपूर येथील असून यांना भिसी पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी इतर 2 फरार आरोपीसह मिळून 3 मोटार सायकल चोरी केल्याचे व त्या मोटार सायकल काम्पा ता. नागभिड येथिल राहूल तिमाजी मोहंकर याला विकल्याचे सांगीतले, या माहितीनुसार आरोपी कडून एकुण 3 पॅशन प्रो मोटर सायकल याची एकुण अंदाजे किंमत 1,30,000 रुपयांच्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या.सदर कारवाई हि पोलीस स्टेशन भिसी ओ. पी. शंकरपुर येथिल सपोनि विनोद जांभळे ,पोहवा – दिलीप वाघमारे, सुधाकर लोहटकर, पो. अं. परमेश्वर नागरगोजे, अमित उत्कुडे, मंगेश बन्सोड यांनी केली. पुढील तपास भिसी पोलीस स्टेशन करीत आहे.