तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत रेणाखळी मुलांचा संघ प्रथम
जिल्हा प्रतिनिधी.:अहमद अन्सारी परभणी
दिनांक २५/०९/२०२३ रोजी जिल्हा क्रीडा अधिकाऱी कार्यालय परभणी आणि गटसाधन केंद्र पंचायत समिती पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने कै.स.गो. नखाते माध्यमिक विद्यालय देवनांद्रा येथे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षण विस्तार अधिकारी मुकेश राठोड, स्पर्धेचे उद्घाटक पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सदस्य तथा मोंटेक्स बॉल क्रिकेट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अजिंक्यभैय्या नखाते ,प्रमुख पाहुणे दत्ताभाऊ वऱ्हाडे (उपसरपंच),जि. प. प्रशाला बोरगव्हाण मुख्याध्यापक गिल्डा सर, जि.प.प्रशाला लोणी मुख्याध्यापक चिंचाने सर ,प्रस्तुत शाळेचे ज्येष्ठ शिक्षक विष्णू भिसे, सर, प्रा.अनुरथ काळे सर , भरत घांडगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .या स्पर्धेचे प्रास्ताविक पाथरी तालुका क्रीडा संयोजक तुकाराम शेळके सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्र्वर गायकवाड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रिडा शिक्षक रणधीर सोळंके सर यांनी मानले या स्पर्धेमध्ये एकूण 45 संघानी सहभाग नोंदवला होता. 14 वर्षआतील मुली जि. प. प्रा .शाळा कासापुरी सर्वप्रथम तर जि. पर. प्रा. शाळा पोहेटाकळी सर्व द्वितीय १४ वर्षआतील मुले जि. प प्रा. शाळा रेनाखळी सर्वप्रथम तर जि प.प्रा. शाळा लोणी सर्व द्वितीय १७ वर्षे मुले आणि मुली जि. प.प्रशाला बोरगव्हाण सर्वप्रथम तर मुलांमध्ये नेताजी सुभाष विद्यालय पाथरी सर्व द्वितीय आणि मुलींमध्ये कै.स.गो. नखाते विद्यालय देवनांद्रा सर्व द्वितीय १९ वर्षआतील मुले नेताजी सुभाष विद्यालय पाथरी प्रथम व कै. स गो नखाते विद्यालय देवनांद्रा द्वितीय,१९ वर्षआतील मुली कै. स. गो. नखाते विद्यालय देवनांद्रा प्रथम व शांताबाई नखाते विद्यालय पाथरी
वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रिडा शिक्षक सुरेश लहाने सर, अरविंद गजमल, सचिन चव्हाण, ,विजय पोपळघट,भामरे सर, महेंद्र उर्फ नाना धर्म, प्रभाकर जाधव, भास्कर दूधमोगरे, आणि पंच म्हणून धनंजय नखाते, रामेश्वर नखाते, गणेश धर्मे, रामप्रसाद धर्मे ,कच्छवे सर, नवनाथ सुरवसे आणि माध्यमिक विद्यालयातील सर्व सहकारी शिक्षक आदींनी सहकार्य केले.व विजेत्या खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.