चिमुर पोलीसांची फुटपाथ रोडवरील विक्रेत्यांवर कार्यवाही
तालुका प्रतिनिधी: मंगेश शेंडे चिमुर
चिमूर पोलिसांनी वारंवार दिलेल्या सूचनांकडे वाहन चालक व दुकानदार/विक्रेत्यांनी दुर्लक्ष केल्याने दिनांक 09/12/21 रोजी पोलीस स्टेशन चिमूर यांनी चिमूर शहरात विशेष मोहीम राबवून सार्वजनिक रस्त्यावर जीवितास धोका होईल अशा प्रकारे उभे असलेल्या एकूण 09 वाहनांवर कलम 283 भादंवि अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच फुटपाथ व रोडवर दुकानदार/ विक्रेत्यांनी आपले दुकान थाटून लोकांना जाण्यायेण्यास अडथळा निर्माण केला, अशा एकूण 19 दुकानदार/ विक्रेत्यांवर कलम 102/117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कार्यवाही करण्यात आली. यापुढे नियमांचे उल्लघन केल्यास कठोर कारवाई चे संकेत चिमुर पोलिसांनी दीलेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे नेतृत्वात Api मंगेश मोहोड व पोलीस कर्मचारी दिलीप वाढवे, नितेश गडदे, प्रमोद गुट्टे, राहुल चांदेकर इत्यादींनी केली.