ताज्या घडामोडी

पर्जन्य मापी यांचे प्रश्न न सुटल्यास १५ ऑगस्ट २०२२ पासून कामावर बहिष्कार आंदोलन.नासिक विभागीय बैठकीत निर्णय

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

नंदुरबार येथे जलसंपदा विभाग अंतर्गत कार्यरत पावसाचे पाणी मोजनारे ची पर्जन्यमापक कर्मचारी युनियन ची पाच जिल्ह्यांची नासिक विभागीय बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रातील पर्जन्यमापक कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने किमान वेतन 18 हजार रुपये द्यावी. तसेच जलसंपदा खात्याच्या जागा भरतांना या कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे.मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने पीठाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व 600 कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे. त्यांना सामाजिक सुरक्षा लागू करण्यात याव ,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात यावे. या मागण्यांबाबत महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने निर्णय न घेतल्यास येत्या 15 ऑगस्ट 2022पासून पर्जन्यमापक कर्मचारी त्यांच्या कामावर बहिष्कार घालतील असा इशारा राज्य युनियनचे अध्यक्ष का अमृत महाजन यांनी बैठकीचा समारोप करतांना दिला . या बैठकीला जळगाव धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील युनियनचे प्रतिनिधी हजर होते. अध्यकस्थानी राज्य युनियनचे अध्यक्ष का अमृत महाजन होते. या बैठकीचे निमंत्रक श्री विश्वनाथ सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे स्वागत पर भाषण केले..
याबाबत सविस्तर माहिती अशी की ,महाराष्ट्र राज्य पर्जन्यमापक कर्मचारी युनियन युनियन चे राज्य सचिव एम आर मोरे यांनी गेल्या काळातील महाराष्ट्र शासनाची केलेल्या पत्रव्यवहार पाठ पूरावा व आंदोलनाची माहिती दिली या बैठकीत का महाजन पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात पर्जन्य मापक कर्मचाऱ्यांना फक्त दर वर्षाला तीन हजार सहाशे रुपये मिळतात . म्हणजेच दरमहा फक्त तीनशे रुपये वेतन मिळते. पूर्वी फक्त दरमहा तीस रुपये वेतन मिळे. युनियन केल्यावर पत्रव्यवहार वाढल्यानंतर तीन हजार सहाशे रुपये वर्षाला मिळू लागले. या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी जलसंपदा विभागाचे कडून आलेल्या सूचनानचे पालन करावे लागते. साधे पर्जन्यमापक/ स्वयंचलित पर्जन्यमाप न साहित्य मिळते या कर्मचाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात फक्त ६००ते ७०० कर्मचारी आहेत. जलसंपदा विभागात हजारो जागा रिक्त असून या कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या निकालानुसार जलसंपदा विभागात कायम करण्यात आले महाराष्ट्रातील सहाशे कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा चेरापुंजी ते कोकण समान कामाला समान वेतन ही मूलभूत मागणी घेऊन आपली संघटना मजबूत करा असे आवाहन का महाजन त्यांनी आपल्या भाषणात केले .आभार प्रदर्शनाचे काम राज्य उपाध्यक्ष नरेंद्र उपासनी यांनी केले.
जबाबदार प्रतिनिधींची निवड
या बैठकीत राज्य कार्याध्यक्ष म्हणून का विश्वनाथ सूर्यवंशी यांना समावेश करण्यात आले त्याच प्रमाणे जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून सलीम तडवी मोहमंडली, धुळे जिल्हाध्यक्ष बेचाबाबा( वारसा), नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोकुळ कोकणी( बीचगाव) नासिक जिल्हा ध्यक्ष दीपक देशमुख ताहराबाद अशा जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या संघटना विस्तार करण्याचे ठरले येत्या २८/२९ मे रोजी किसान सभेचे राज्य अधिवेशन शिरपूर येथे १०वाजता सुरू होणार आहे तेथे सहभागी व्हावे असेही ठरले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close