आझादी का अमृत महोत्सव २.० निमीत्त किशोरी, स्तनदा व गरोदर माता यांना मार्गदर्शन कार्यक्रम

प्रतिनिधी: हेमंत बोरकर
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचे वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आझादी का अमृत महोत्सव सामाजिक समावेशन कार्यक्रम अंतर्गत मौजा गदगाव तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे आज दिनांक १०/०५/२०२३ ला सायंकाळी ५.०० वाजता किशोरवीन मुली, स्तनदा माता व गरोदर माता यांना आरोग्य पोषण आहार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
युवावस्थेतील मुलींच्या मासिक समस्या मासिक पाळी येण्याआधीच तुम्हाला तिच्या अनेक अस्वस्थ लक्षणांची जाणीव करून देते किंवा म्हणा की ते तिच्या येण्याची कल्पना देते. ज्यामध्ये, लक्षणांमध्ये हातपाय दुखणे, पोटाच्या खालच्या भागात किंचित वेदना, मळमळ, थकवा, पेटके इ. जे मासिक पाळी सुरू झाल्यावर थांबतात.
पण मासिक पाळीशी संबंधित या केवळ किरकोळ समस्या आहेत, असे नाही! उलट, इतर गंभीर समस्या देखील कधीकधी डोके वर काढतात. उदाहरणार्थ, ‘पाळी’ दर महिन्याला वेळेवर येत नाही, कधी वेळेच्या आधी तर कधी वेळेनंतर. कधी कधी खूप रक्तस्त्राव होतो तर कधी एक-दोन दिवसात पाळी थांबते. आणि काही प्रकरणांमध्ये,पाळी आली तर ती 1 महिना चालू राहते , असेही दिसून येतात असे मार्गद्शन केले
गरोदर माता यांनी यांनी गरोदर पणात चार रंगाचा आहार सेवन करावे (लाल ) गाजर , (पिवळा) पपई, (पांढरा) अंडी, दूध (हिरवा) हिरवी पाले भाजी या आहाराचे सेवन करावे.
स्तनदा माता यांनी मूल जन्मानंतर अर्धा तासात बाळाला चिकदूध द्यावे कारण त्यामध्ये कोलस्ट्रम नावाचा घटक असतो त्यामुळे बाळाची रोग्रतिकारकशक्ती वाढते तसेच तर दोन तासांनी बाळाला स्तनपान करावेत ६ महिन्यानंतर बाळाला जेवण द्यावे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक, सौ. वीणा काळे आशा वर्कर, सौ. विद्या शंभरकर crp व गावातील किशोवयीन मुली, स्तनदा माता व गरोदर माता उपस्थित होत्या.