ताज्या घडामोडी

ना.आदित्य ठाकरे यांचे वरोरा येथे जंगी स्वागत

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पर्यटन आणि आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता रविवारला वरोरा येथील आनंदवन चौकात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्या तर्फे जंगी स्वागत करण्यात आले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी मोठा हार घालून आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.

आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच फटाक्याच्या आवाजात शिवसैनिकांनी घोषणा देत मोठा जयघोष केला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे, उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम, युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस व शिवसेना तालुका संघटक मनीष जेठानी, जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम, वरोरा- भद्रावती विधानसभा संपर्कप्रमुख संजय काळे, चिमूर येथील संपर्कप्रमुख आसिफ बागवान,शहर प्रमुख संदीप मेश्राम, माजी नगरसेवक दिनेश यादव, युवासेना उपजिल्हाप्रमुख आलेख रट्टे, तालुका प्रमुख, महिला पदाधिकारी अलका पचारे व अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तत्पूर्वी ते टेमुर्डा येथे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते यांच्या नेतृत्वात उपजिल्हा संघटिका मंजुषा काकडे, सचिन भोयर, नरेश काळे, अमोल झिले, संजय निब्रड ,संचित पिंपळकर आदींनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. वरोरा तालुक्यात वाघाची दहशत असल्यामुळे येथे भारनियमन करू नये तसेच जामणी पुलाचे काम त्वरित करावे याकरिता निवेदन देण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close