ताज्या घडामोडी

ओबीसींनी एकमेकांच्या पायात पाय घालू नयेत- नानासाहेब राऊत

जिल्हा प्रतिनिधि:अहमद अन्सारी परभणी

ओबीसी बांधवांनी एकमेकांच्या पायात पाय घालायाच सोडून एकमेकांच्या हातात हात घालावेत .त्यामुळे आपल्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल असे मत ज्येष्ठ नेते माजी सभापती नानासाहेब राऊत यांनी मंगळवारी गंगाखेड येथे धरणे आंदोलन स्थळी बोलतांना व्यक्त केलं.
गंगाखेड तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या वतीने मागील चार दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी परभणी जिल्ह्याचे नेते माजी सभापती नानासाहेब राऊत यांनी सायंकाळी भेट देत मार्गदर्शन केलं. पुढे बोलताना राऊत म्हणाले की महाराष्ट्रात ओबीसींची संख्या मोठी आहे .पण फक्त एकत्र येत नसल्याने आपण आपल्या मागण्या आजपर्यंत मान्य करून घेऊ शकलो नाहीत. यापुढे ओबीसींनी आपापले मतभेद विसरून एकमेकांच्या पायात पाय घालायचे सोडून द्यावं आणि एकमेकांच्या हातात हात देत एकमेकाला प्रगतीकडे न्यावे असे आवाहनही त्यांनी केलं . यावेळी लोकेश्रेय मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष शेख सोहेल यांनी उपस्थित राहून या आंदोलनास आपला पाठिंबा व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर गोविंद लटपटे, सखाराम बोबडे पडेगावकर बालाजी मुंडे, सुरेश बंडगर , जयदेव मिसे , मोहन गीते, इसतिहाक अन्सारी, राम भोळे,माधव शेंडगे, सदाशिव कुंडगिर ,मोतीराम कोरके, राम मरगळ, डॉ गोविंद मुंडे आदीसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल फड यांनी केले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close