बार्टी व सामाजिक न्याय विभागाच्या योजना ह्या समाजाच्या सकारात्मक परिवर्तनाची क्रिया आहे -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे
तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक न्याय तत्वे रुजवून येथील कामगार शेतकरी मजूर बेरोजगार भटके वंचीत आदिवासी तसेच महिला यांचा आर्थिक सामाजिक विकास होऊन समाज परिवर्तन बाबासाहेब यांना अपेक्षित होते समाजाच्या उत्थानासाठी सामाजिक न्याय सर्वांना मिळावा यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी व त्यांचा लाभ हे जनतेच्या विकासासाठी व्हावा हे स्वप्न बाबासाहेब यांचे बार्टी व सामाजिक न्याय विभागाच्या योजनाची माहिती आता घरोघरी समतादूत देणार यामुळे बार्टी व सामाजिक न्याय विभागाच्या योजना ह्या समाजाच्या सकारात्मक परिवर्तनाची प्रक्रिया व प्रेरणा आहे असे ड्रा बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी महाराष्ट्र व कामगार दिनी उपस्थित सर्वांना दिली या योजनेच्या परिपत्रकाचे उदघाटन विद्यमान आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती एस. डी. एम. प्रकाश संकपाळ तहसीलदार प्राजक्ता बुरांडे ,डी वाय एस पी संजय सांगळे ठाणेदार गभने पंचायत समिती सहारे विस्तार अधिकारी ग्रामसेवक आदि उपस्थित होते यावेळी चिमूर येथील 93 ग्रामपंचायत येथे योजनांचे परिपत्रक देण्यात आले आहे सम्पूर्ण ग्रामपंचायत मनध्ये ग्रामसेवक हे ग्राम सभेच्या दिवशी सर्व नागरिकांना या योजनेची माहिती देणार आहेत या योजनांमध्ये बचत गट मिनी टॅक्टर, सामूहिक विवाहासाठी कन्यादान योजना, भारत सरकार मॅट्रीकोत्तर स्कॉलरशिप ,आंतरजातीय विवाह,स्वधार योजना, रमाई आवास योजना ,कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना,गटई कामगार ,मूला मुलीचे शासकीय वसतिगृहे ,बार्टी तर्फे स्पर्धा परीक्षा ,आधीछत्रवृत्ती तसेच सर्व चिमूर तालुक्यातील ग्रामपंचायत येथील नागरिकांनि या विविध योजनांची माहिती ग्रामस्तरांरून घ्यावी असे आवाहन समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी यावेळी केले तसेच जिल्ह्यातील सर्व समतादूत यांच्याशी सम्पर्क करून विविध योजना चा लाभ घेऊन आपला आर्थिक विकास करावा समाजाचा विकास हा म्हणजे माझ्या स्वतःचा विकास होय.