सामुहिक बलात्कारप्रकरणी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करा…भाजप व अन्य संघटनेची मागणी
उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन…..
तालुका प्रतिनिधीः कल्यांनी मुनघाटे नागभीड
नागभीड शहरात काल माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका मुलीवर काही नराधमांनी सामुहिक अत्याचार करून त्याचे विडीओ सोशल मिडीयावर वायरल केल्याप्रकरणी आज सर्वत्र संताप व्यक्त केला असून आज, भारतीय जनता पार्टी नागभीड,भाजपा महिला आघाडी, विश्व हिंदू परिषद,बजरंग दल, दुर्गा विहिणी,मातृशक्ती संघटना यांच्या द्वारे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करीत.घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपींना लगेच अटक करून कठोर कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना सामुहिक निवेदन देण्यात आले. आरोपीविरुद्ध तत्काळ कठोर कारवाई न झाल्यास नागभीड शहरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सहभागी पक्ष व संघटनेद्वारा देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे,चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, तालुकाध्यक्ष संतोष रडके,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आवेश पठाण, ओबीसी आघाडी अध्यक्ष रामदास बहेकर,महिला आघाडी तालुका अध्यक्ष इंदुताई आंबोरकर,महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस प्रिया लांबट,जहांगीर कुरेशी, डॉ.पवन नागरे,बंडू गेडाम ,जावेद शेख ,रमेश ठाकरे,विजय ठाकरे,रमाकांत ठाकरे,रवी देशमुख ,धनराज काटेखाये, अशोक पिसे,दिनेश समर्थ,बाबा जांभुळे,चंदन चावरे,हुमेश अमृतकर,संजय मालोदे,गुड्डू भोयर,रोमी कटारे,अनंता बावणे,योगेश मिसार,विशाल बावणे,प्रफुल मोहजनकर, राम वैद्य,प्रवीण सोनटक्के,सागर पुराम,धीरज पूराम,उत्कर्ष राऊत,आदित्य वाढई,अभिषेक मुळे,अनमोल कामडी,अंकुश कामडी,पवन कामडी,रोशन आटमांडे,स्नेहा कुर्झेकार,संचिता येरणे, मनीषा येरणे,नीता गीरीपुंजे व असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.