ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

गोपाळा फाउंडेशन परभणी च्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती व स्वच्छताचे जनक राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी किर्तन महोत्सव व गरजूंना साहित्य वाटप दिनांक एक मार्च 2025 कारेगाव रोड उघडा महादेव परिसर संध्याकाळी दोन्ही महोत्सव व वाटप कीर्तन आधी कार्यक्रम साजरे झाले

या कार्यक्रमासाठी झी टॉकीज फेस राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प अर्चनाताई सोळंके यांचे भव्य दिव्य कीर्तन महोत्सव संपन्न झाला तसेच या कार्यक्रमांमध्ये गरजुंना साहित्य वाटप यामध्ये एक नग गिरणी तीन नग सायकल सहा नग शिलाई मशीन 100 नग शैक्षणिक साहित्य एक इस्तरी एक हातगाडा यांच्यासह बहुसंख्य सामाजिक उपक्रमातून गोपाळा फाउंडेशन परभणीचे अध्यक्ष संतोष भाऊ खराटे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजन करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक परभणी विधानसभेचे आमदार डॉ राहुलजी पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक अँड पवनजी निकम प्रमुख पाहुणे वीर वारकरी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर प्रकाश महाराज कंठाळे स्वच्छता दूत कावळे मामा जय शिवराय मित्रमंडळाचे अध्यक्ष माऊली मोहिते माजी सभापती विशाल जी बुधवंत संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर काका शिंदे हिंदू वारियर्स मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रदीप भालेराव गोपाळ कदम बंडू नाना बिडकर बाल व्याख्याती आरोही खंदारे बहुसंख्य राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील समाजसेवक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच संतोष भाऊ खराटे यांचा सत्कार आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यांच्यासह सर्व भजनी मंडळी वारकरी व मृदंग वादक गायक

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गोपाळा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष भाऊ खराटे पिंटू कदम बालाजी दमुके कृष्णा शिंदे त्यांच्यासह संयोजक गोपाळा फाउंडेशन परभणी संत गाडगे महाराज जयंती महोत्सव समिती व छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती सर्व पदाधिकारी व सर्व मित्र परिवार सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ मित्र मंडळ परिसर यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती गोपाळा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष भाऊ खराटे यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close