ताज्या घडामोडी
सुशी दाबगाव येथील महिलेवर वाघाचा हल्ला

तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल
मूल तालुक्यातील सुशी दाबगाव या गावातील महिला जंगलात सरपणासाठी गेली असता जंगलातील झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर अचानक हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.
वैशाली विलास मांदाडे वय 30 वर्ष असे वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर घटना वनविकास महामंडळाच्या सुशी दाबगाव येथील कक्ष क्रमांक 527 मध्ये घडली आहे.
महिनाभरातील वाघाच्या हल्ल्याची चौथी घटना असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.