ताज्या घडामोडी

जानेवारी २०२५ पर्यंत नगर परिषद कार्यालय ब्रम्हपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बदलवून देण्याचे मा. आमदार वडेट्टीवार यांनी दिले आश्वासन

तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे ब्रम्हपूरी

नगर परिषद कार्यालय, ब्रम्हपुरी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृत पुतळ्याच्या शरीर रचनेने प्रमाणात नसल्याचे बघ्यांना दिसत आहे त्यामुळे हे योग्य नसून तत्काळ पुतळा हटवून नवीन पुतळा बसवण्यात यावा याकरिता मोठ्या संख्येने युवकांनी प्रथम वडेट्टीवार यांना व्हाट्सअप मोहीम राबविली त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधता वडेट्टीवार यांनी त्यांना चर्चा साठी ०३/१०/२०२४ ला बोलावले.
वरील तारखेस नागरिक एकत्र येऊन वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी निवेदन देण्यात आले व त्याच्या समोर मुद्दा उपस्थित केला असता ते असे म्हणाले की, नगरपरिषद ब्रम्हपुरी यांनी नियमा प्रमाणे कार्यवाही केली.सदर पुतळा हा शासकीय परिसरात असल्या मुळे जे काही शासकीय नियम आहेत ते पालन केले आहेत.त्यात J.J. school of arts असो व इतर शासकीय विभाग/कमिट्या असो या सर्व नियमांचे पालन करण्यात आलेले आहे.पण आपण सर्व आलात आणि या बद्दल माहिती दिली .कोणत्याही महापुरुषाचे अपमान होऊ नये असे आपल्याला वाटते.बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना वंदनीय आहेत.आत्ता ८-१० दिवसात आचारसंहिता लागेल आणि पुतळ्या संबंधित काम हे विविध कार्यालय मार्फत होत असल्या मुळे त्याला थोडा वेळ लागतो आणि तेव्हा पर्यंत आचारसंहिता लागेल नंतर कोणताही काम होणार नाही. विजय वडेट्टीवार यांनी शब्द दिला आहे की मी निवडणूक झाल्या नंतर जेव्हा पुन्हा आमदार बनेल तेव्हा दुसरा पुतळा लाऊन देणार त्या पेक्षा मोठा पण लावू. जानेवारी पर्यंत लाऊन दिलं जाईल.शिल्पकारा कळून पुतळ्या च्या इतर डिझाईन मागवून काही दिवसात आपल्याला तसेच समाजातील इतर लोकांना बोलावलं जाईल आणि नवीन पुतळा आपल्या नुसार अंतिम करण्यात येईल.
त्यामुळे नवीन पुतळा लवकरात लवकर होईल अशी नगरवासियांची अपेक्षा आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close