मा. अनिलभाऊ नखाते यांचा वाढदिवस गुनवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून साजरा


जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी
दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नखाते विद्यालय पाथरी ता. पाथरी जि. परभणी येथे वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शालेय नृत्य स्पर्धेचे उद्घाटन व विविध स्पर्धेत प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी चे सभापती मा. अनिलभाऊ नखाते साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते सत्कारमूर्ती तथा कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मा.शामराव धर्मे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक मा. नारायणराव आढाव, कृ.ऊ.बा. समितीचे संचालक मा.आनंद धनले,मा.अजिंक्यभैया नखाते संचालक वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ, बानेगाव सोसायटीचे चेअरमन मा. बालासाहेब मुजमुले, माजी मुख्याध्यापक शेख खैसर सर, प्रस्तुत शाळेचे मुख्याध्यापक यादव याएन.ई. प्राचार्य डहाळे के.एन. पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.