ताज्या घडामोडी

रामदेवबाबा यांच्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निषेध आंदोलन

रामदेवबाबा यांना अटक करा.

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

दरम्यान मागील काही दिवसांपासून मिडिया मध्ये बाबा रामदेव यांची एक क्लिप व्हायरल होत आहे.ज्यामध्ये ते स्वतःला अग्निहोत्री ब्राह्मण समजून स्वतः ची पाठ थोपटून घेतात आणि ओबीसी समाजाची “ऐसी तैसी”उच्चारून ओबीसी समाजाचा अपमान करीत असल्याचे दिसत आहे.त्यांच्या या कृत्यानंतर ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर कडून रामदेव बाबा यांचा निषेध नोंदवुन तहसील कार्यालय चिमुर समोर आंदोलण करण्यात आले.बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणी सूद्धा सर्वस्तरातून होत आहे.

रामदेवबाबा यांचे व्यवसाय व उद्योग या देशातील ६५ टक्के ओबीसी समाज बांधवांमुळे विक्री होत आहे . ओबीसी समाजाच्या भावना अशा वक्त्यांनी दुखावल्या गेल्या त्यावेळी ओबीसी महासंघ आक्रमक रामदेव बाबा यांचा विरोधात आक्रमक झाला. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर कडुन आंदोलन करण्यात आले
.यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चिमुर तालुका अध्यक्ष मारोतराव अतकरे, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ जिल्हा सहसचिव रामदास कामडी, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ चिमुर तालुका अध्यक्ष कवडू लोहकरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ युवा विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सातपुते, प्रभाकरराव पिसे,राजू लोणारे, संजय बावणकर ,जयदेव रेवतकर,ममता डुकरे, भावना बावणकर, वर्षा शेंडे, दुर्गा चावरे, समीर बल्की तसेच शेकडो ओबीसी बांधव उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close