ताज्या घडामोडी

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची आढावा बैठक हिंगोली येथे संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती,ब्रिक्स मानवाधिकार मिशन सामाजिक न्याय मराठवाडा विभाग यांच्या वतीने आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा, मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडित तिडके,मराठवाडा विभाग मुख्य संघटक सचिन दराडे,हिंगोली शेतकरी जिल्हा अध्यक्ष शंकरराव देशमुख,जिल्हाउपाध्यक्ष इरफान पठाण,महिला जिल्हाध्यक्षा सौ.वंदना थिटे,जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ नरवाडे, हिंगोली तालुका अध्यक्ष बाळू सुर्वे, सेनगाव तालुका अध्यक्ष गजानन टेकाळे, गणेश वानखेडे , परभणी महिला जिल्हाध्यक्षा सौ.रेखाताई मनेरे, यांनी अपले ननोगत यृकत केले या बैठकीस परभणी व हिंगोली जिलहा संयुकत आढावा बैठक राषटेीय अधयश आदरणीय मा. प्रदिप पाटील खंडापुरकर बाबा यांचा मागँरदरशना खाली संपन झाली या बैठकीस सखाराम आखले, वंदना जोंधळे,सौ. जयसीरी पुंडगे ताई ,सौ.अंतिका वाघमारे,पाथरी तालुका अधशय सौ.सुमन साळवे ,आहिलयाबाई तुपसमींद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती
आज घेण्यात आलेल्या बैठकीत हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी, सामाजिक न्याय व मानव अधिकार संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने लातूर येथील प्रणव श्री मंगल कार्यालय येथे दोन दिवशीय अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी दिली. हिंगोली जिल्ह्यात होत असलेल्या स्वस्त धान्यात होत असलेला भ्रष्टाचार , अवैद्य दारू विक्री, तसेच 353 कलम यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात समितीच्या माध्यमातून आवाज उठवण्यात येईल तसेच ग्रामीण भागातील मुख्यालय राहत नसलेल्या कामचुकार संबंधित ग्रामसेवक ,शिक्षक,तलाठी ,व डॉक्टर ,यांना सक्तीचे निर्देश द्यावेत संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी कामचुकार अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करून जनतेला सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी केली यावेळी मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडित तिडके. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल लोंढे यांनी केले.तर प्रास्ताविक बालाजी वानखेडे यांनी केले. तर आभार इरफान पठाण यांनी मानले.परभणी जिलहा अधयश सौ.रेखाताई मवेरे यांनी परभणी जिलहायाचा आढावा सादर केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती हिंगोली च्या सर्व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close