ताज्या घडामोडी

खेरडा या गावात पँथर आर्मी चे महासचिव आशिष भैय्या मुंढे यांची भेट

जिल्हा प्रतिनीधी :अहमद अन्सारी परभणी

थेट खेरडा या गावात दिनांक 08/06/2021 रोजी पँथर आर्मी चे आक्रमक महाराष्ट्र महासचिव आशिष भैय्या मुंढे यांच्या नेतृत्वाखाली खेरडा, ता. पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणी भेट दिली, खेरडा मध्ये जो निंदनीय प्रकार झाला त्या बद्दल आंबेडकरी जनते मध्ये संतापाची भावना आहे, पोलिसांनी एकतर्फी भूमिका घेऊन विनय भंग झालेला असताना हि ते कलम लावले नाहीत, आशिष भैय्या मुंढे यांनी सांगितले की जो पर्यंत पीडितांना न्याय भेटत नाही तो आम्ही त्यांच्या सोबत आहोत,तसेच त्यांनी सर्वांना एकजुट होऊन लढा लढण्याचे आवाहन देखील केले आहे, तसेच पोलिसांनी विनयभंगाचे कलम सुद्धा लावावे अन्याथा भडका उडेल अशा इशारा देण्यात आला, यावेळी पॅंथर आर्मी (स्वराज्य संविधान रक्षक सेना) महाराष्ट्र राज्य महासचिव आशिष भैया मुंडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विशाल कदम लातूर महासचिव विनोद भाऊ मुंडे तालुका अध्यक्ष किरण पंचांगे शहराध्यक्ष केरबा दादा रंजवे तुषार पंचांगे समाधान रणखांबे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close