ताज्या घडामोडी
युवा ग्रामविकास संघटना, नेरीच्या वतीने कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले

उपसंपादक:विशाल इन्दोरकर
युवा ग्रामविकास संघटना, नेरीच्या वतीने कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले.
शेतकऱ्यांना आवश्यक खत योग्य दरात आणि वेळेवर उपलब्ध व्हावे, उपलब्ध साठ्याचे योग्य पद्धतीने वितरण व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले
आपली संघटना केवळ गावातील विकासकामांपुरती मर्यादित नसून, आपल्या गावातील शेतकरी, युवक, महिला आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नांसाठी सकारात्मक पद्धतीने पुढे येणे हा देखील आपला उद्देश आहे

गावाचा विकास म्हणजे फक्त रस्ते आणि इमारतींचा विकास नाही आपल्या शेतकऱ्यांचा विकासही तितकाच महत्त्वाचा आहे
आपल्या नेरीच्या प्रत्येक घटकासाठी आवाज उठवत, सकारात्मक आणि लोकशाही मार्गाने आपली वाटचाल अशीच सुरू राहील.
युवा ग्रामविकास संघटना, नेरी.! ❤️🙏









