चिमुर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
कवडू लोहकरे यांची मुख्यमंत्री यांचे कडे मागणी
शेतकरी अस्मानी संकटात
पावसाळा सूरू होऊनही दिड महिन्यांचा कालावधी लोटुन सुद्धा चिमुर तालुक्यात साजेसा पाऊस पडला नाही.पावसाचा हंगाम कधीचाच सुरू झाला तरी पावसाची फक्त रिमझिम सुरू आहे.चिमुर तालुक्यातील रोवणे अडकले आहे.रोवण्या इतके परे होऊनही पाऊस जोराचा पडला नाही.त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.सुरूवातीपासुनच पावसाळा हंगाम रिमझिम पावसाने सुरूवात झाली.आज, उद्या मोठा पाऊस येईल या आशेने शेतकरी बांधावर उभा आहे.पण पावसाने घोर निराशा करुन शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

चिमुर तालुक्यात अजुनही मोठा पाऊस झाला नाही त्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. चिमुर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पावसाच्या लहरी पणामुळे शेतात धानाची पेरणी, आवत्या हा मार्ग अवलंबला आहे.
आधीच बॅक, सोसायटी ,खाजगी बॅक यांच्या कडुन कर्ज घेऊन शेतकरी शेती करित असतांना शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे.ऐन ह़ंगामात पावसाने दडी
मारल्याने रोवने झाले नाही.बॅकेचे कर्ज , मालाला हमीभाव कमी, शेतीचे नुकसान यामुळे कंटाळून शेतकरी आत्महत्या करित आहे.शेतातील छोटे-छोटे तलाव, बोड्या अजुनही पाणी जमा झाले नाही.त्यामुळे चिमुर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी कवडू लोहकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे करण्यात आली आहे.
कवडू लोहकरे यांची प्रतिक्रिया
या वर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या भात रोवणी खोळंबल्या आहे.कृषी विभागाच्या
आकडेवारी नूसार पेरीव भात क्षेत्र ३१०४ हेक्टर ,आवत्या भात क्षेत्र ७९५ हेक्टर क्षेत्र व सध्या स्थितीत चिमुर तालुक्यात झालेली रोवणी १००९८ हेक्टर आहे.सध्यास्थित चिमुर तालुक्यात सरासरी जुन महिना ४०टक्के जुलै महिना ८५.५ व आगस्ट ८.८टक्केच पाऊस पडला आहे**
कवडू लोहकरे
पर्यावरण प्रेमी चिमुर









