ताज्या घडामोडी

दिल्ली येथील महिला पोलीस व पुणे येथे 14 वर्षीय बालिकेवर केलेल्या बलात्कारींना भर चौकात फाशी द्या

राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाने राष्ट्रपती ना केली मागणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

नवी दिल्ली येथील महिला पोलीसांवर अत्याचार करून तिची निर्गुण खून करणारे आरोपींना तसेच पुणे येथील चौदा वर्षाच्या मुलीवर नऊ जणांनी बलत्कार करून अत्याचार केलेल्या आरोपींना भर चौकात फाशी देणे बाबत व त्यांच्या निषेध राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा च्या माध्यमातून मा राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी अमळनेर यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.
दिल्ली पोलीस दलात नोकरी करणारी २१ वर्षीय महिला पोलीस ही २७ ऑगस्ट २०२१ रोजी संध्याकाळ पासुन बेपत्ता झालेली होती. तिचा शोध घेतल्यावर ती सापडून आली नाही. नंतर तिचा मृतदेह आढळुन आलेला असुन तिचावर ५० ठिकाणी चाकूचे वार करून तिचे दोन्ही स्तन कापुन टाकण्यात आलेले असून तिचावर सामुहिक बलात्कार सुद्धा झालेला असुन ते अत्यंत पाशवी व संतापजनक घटना असुन आम्ही हे वाईट कृत्य करणाऱ्या राक्षसांना भरचौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच पुणे येथे १४ वर्षीय मुलीवर नऊ जणांनी अमानुषपणे सामुहिक बलात्कार केले
असुन पिडीत मुलगी बिहारहून येणारे मित्राला भेटण्यासाठी रात्री पुणे येथील रेल्वे स्टेशनवर आली होती.मात्र ट्रेन नसल्याने स्टेशनवरच फिरत असतांना रिक्षाचालक नरधामानी तिला सोडण्याच्या बहाण्याने अपहरण केले व त्याने मित्रांसह वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बल्ताकार केला आहे. तिचावर सामुहिक बलात्कार झालेला असुन ते अत्यंत पाशवी व संतापजनक घटना असून याचा निषेध निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
याप्रसंगी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष नाविद शेख,मा नगरसेवक फिरोजखान उस्मानखान,गुलाबनबी करीमखान,सईद शेख सलीम,अख्तर अली,साबीर बागवान, भिम आर्मीचे प्रवीण बैसाने, भारत मुक्ती पार्टी चे संदिप सैदाने, बाळासाहेब सोनवणे, भारत मुक्ती मोर्चा उपाध्यक्ष कुदरत अली,इम्रान खाटीक, सादिक खान,रईस खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close