आमदार चषक पाहण्यास प्रेक्षकांची तोबा गर्दी

आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या आमदार चषक राज्यस्तरीय महिला निमंत्रित कबड्डी स्पर्धा व जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेचे आज बक्षीस वितरण
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिकारी सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त माननीय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वतीने आमदार चषक राज्यस्तरीय महिला निमंत्रित कबड्डी स्पर्धा व जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन गंगाखेड येथे करण्यात आले आहे. राज्यस्तरीय महिला निमंत्रित संघाचे दि. 21 फेब्रुवारी रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये साखळी पद्धतीने गट अ,ब,क,ड अनुक्रमे सामने खेळवण्यात आले. प्रत्येक गटामध्ये ५ संघांचा समावेश करण्यात आला होता .
प्रथम लढत सामना ‘ड’ गटातून करण्यात आला यामध्ये विश्वशांती स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई शहर व आनंदवन क्रीडा मंडळ याच्यात सामना होऊन आनंदवन क्रीडा मंडळाने एकतर्फी विजय मिळवला.
दुसरा सामना मानवत स्पोर्ट्स अकॅडमी मानवत व द्रोणा स्पोर्ट्स अकॅडमी पूणे यामध्ये विजयी संघ द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकॅडमी मानवत विजयी झाला.कला व क्रीडा विकास पिंपरी चिंचवड व माऊली प्रतिष्ठान मुंबई शहर हा सामना खूप अटितटीने झाला यात विजयी संघ पिंपरी चिंचवड १गुणांनी विजयी झाला. होतकरू क्रीडा मंडळ ठाणे व शिवशक्ती क्रीडा संघ धुळे यांच्यात सामना होऊन शिवशक्ती क्रीडा संघाचा विजय झाला. लक्ष्यद्विप क्रीडा अकॅडमी व विद्यानिकेतन हायस्कूल शिवाजीनगर यामध्ये लक्ष्यद्विप क्रीडा मंडळ विजयी ठरला. प्रकाश बालवाडकर पूणे व शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई यामध्ये शिवशक्ती क्रीडा मंडळाने एकतर्फी सामना जिंकला. सुवर्णयुग क्रीडा मंडळ पूणे व आदर्श स्पोर्ट्स क्लब हिंगोली यामध्ये सामना होऊन सुवर्णयुग क्रीडा मंडळ पूणे विजयी झाला.ज्ञानप्रबोधनी क्रीडा मंडळ पुणे व त्रिमूर्ती संघ नेवासा यामध्ये सामना झाला यात ज्ञानप्रबोधनी क्रीडा मंडळ पुणे विजयी झाला.
दि.22 फेब्रुवारी रोजी झालेल्या सामना शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई व कला क्रीडा विकास पिंपरी चिंचवड यांच्यात खूप अटितटीचा सामना होऊन शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबईने हा सामना जिंकला.माऊली प्रतिष्ठान क्रीडा मंडळ मुंबई व प्रकाश बालवाडकर क्रीडा मंडळ पूणे यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रकाश बाल वाडकर क्रीडा मंडळ पुणे विजय संघ ठरला.कला व क्रीडा विकास मंडळ पिंपरी चिंचवड व प्रकाश बालवाडकर क्रीडा मंडळ पूणे यामध्ये विजयी संघ कला व क्रीडा विकास मंडळ पिंपरी चिंचवड हा ठरला. ‘अ’ गटातून शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई विजयी ठरली तर उपविजेता कला व क्रीडा विकास मंडळ पिंपरी चिंचवड
तर ‘ब’ गटामध्ये राजमाता क्रीडा मंडळ पुणे व शिवशक्ती क्रीडा मंडळ धुळे यांच्यात सामना झाला यामध्ये राजमाता क्रीडा मंडळ विजयी ठरला. होतकरू क्रीडा मंडळ ठाणे व लक्ष्यद्विप क्रीडा मंडळ यात होतकरू क्रीडा मंडळ विजयी झाला. राजमाता क्रीडा मंडळ पुणे व होतकरू क्रीडा मंडळ ठाणे यांच्या सामन्यात राजमाता क्रीडा मंडळ विजयी ठरला. राजमाता क्रीडा मंडळ पुणे व लक्ष्यव्दिप क्रीडा मंडळ यात राजमाता क्रीडा मंडळ विजयी झाला. ‘ब’ गटामध्ये विजयी संघ राजमाता क्रीडा मंडळ पुणे तर उपविजेता संघ शिवशक्ती क्रीडा मंडळ धुळे ठरला. गट ‘क’ सुवर्ण युग क्रीडा मंडळ पुणे व आदर्श स्पोर्ट्स अकॅडमी हिंगोली यात सुवर्णयुग क्रीडा मंडळ विजयी झाला.गट ‘क’ सुवर्णयुग क्रीडा मंडळ पुणे व मानवत स्पोर्ट्स अकॅडमी यामध्ये सामना होऊन सुवर्णयुग क्रीडा मंडळ विजयी झाला. द्रोणा स्पोर्ट्स अकॅडमी व आदर्श स्पोर्ट्स हिंगोली यामध्ये द्रोणा स्पोर्ट्स विजयी ठरला.मानवत स्पोर्ट्स अकॅडमी व आदर्श क्रीडा मंडळ यामध्ये मानवत स्पोर्ट्स अकॅडमी विजयी झाला.
द्रोणा स्पोर्ट्स पुणे व सुवर्णयुग क्रीडा अकॅडमी यामध्ये द्रोणा स्पोर्ट्स अकॅडमी विजयी झाला.
गट ‘क’ मधुन विजेता द्रोणा स्पोर्ट्स पुणे उपविजेता मानवत स्पोर्ट्स मानवत ठरला.गट ‘ड’ मध्ये विश्वशांती अकॅडमी मुंबई व त्रिमूर्ती क्रीडा मंडळ नेवासा यामध्ये सामने होऊन विश्वशांती विजयी झाला. ज्ञानप्रबोधनी क्रीडा मंडळ पुणे व आनंदवन क्रीडा मंडळ, गंगाखेड यामध्ये आनंदवन क्रीडा मंडळ विजयी ठरला. त्रिमूर्ती क्रीडा मंडळ नेवासा व ज्ञानप्रबोधनी क्रीडा मंडळ पुणे यात ज्ञानप्रबोधनी क्रीडा विजयी झाला.
विश्वशांती अकॅडमी मुंबई व ज्ञानप्रबोधनी क्रीडा मंडळ पुणे यामध्ये विश्वशांती अकॅडमी मुंबई विजयी झाला. गट ‘ड’ झालेल्या सामन्यात
विजेता संघ आनंदवन क्रीडा मंडळ गंगाखेड
उपविजेता विश्वशांती अकॅडमी मुंबई ठरला.
सदरील सामने पाहण्यासाठी गंगाखेड येथील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त पणे दाद दिली.राष्ट्रीय समाज पक्ष व आमदार गुट्टे काका मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली व खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे याकरिता बक्षिसांचा वर्षाव ही केला. आज अंतिम सामने होऊन रात्री आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे. संयोजन समितीचे माणिकराव नागरगोजे, अवधूत गिरी सर, विनोद कुलकर्णी, व्ही. एस. राठोड, बी.यू. कातकडे, एस. यू. राठोड, बडे मॅडम, हळिघोंगडे मॅडम, कल्याणी मॅडम,आंबेकर मॅडम आदी खूप परिश्रम घेत आहेत.