चिंदिमाल तलावात वाघाचा हल्ला; ५८ वर्षीय मोरेश्वर गोपीचंद सावसकडे यांचा मृत्यू

तालुका प्रतिनिधी:सनम टेंभुर्णे
चिंदिमाल : चिंदिमाल तलाव परिसरात वाघाने हल्ला केल्याने ५८ वर्षीय मोरेश्वर गोपीचंद सावसकडे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोरेश्वर सावसकडे हे चार दिवसांपूर्वी चिंदिमाल कडे शेतावर कामाकरिता गेले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध घेतला जात असताना आज तलाव परिसरात त्यांच्यावर वाघाने हल्ला केल्याची माहिती समोर आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून परिसराची पाहणी करण्यात येत असून वाघाचा शोध घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या घटनेमुळे चिंदिमाल तलाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी तलाव व जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.









