ताज्या घडामोडी

माझा गट माझे कुटुंब प्रशिक्षण उत्साहात संपन्न

प्रतिनिधी:हेमंत बोरकर

दिनांक 26 ऑगस्ट रोजी खडसंगी येथील संताजी जगनाडे सभागृह मधे पाणी फॉउंडेशन, कृषी विभाग व उमेद अभियान यांचे मार्फत स्थापन झालेल्या गटांचे ‘ माझा गट माझे कुटुंब -माझी जबाबदारी ‘ बाबत प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडला.
पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनातून महिला, पुरुष व मिश्र शेतकरी गटांच्या माध्यमातून गट शेतीला चालना मिळत असून, सामूहिक शेतीच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रभागातील एकूण 13 गटांनी सहभाग नोंदवला.


प्रशिक्षणादरम्यान सर्व सदस्यांमध्ये दिसणारा आत्मविश्वास आणि उत्साह निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.या प्रशिक्षणामुळे गटातील सदस्यांमध्ये एकोपा, जबाबदारीची जाणीव, संघटन निर्माण होऊन आपल्या शेतीतील उत्पादन वाढ करण्याची जिद्द निर्माण झाली आहे. फार्मर कप स्पर्धेत सहभाग घेऊन तालुका स्तरावरील आणि जिल्हा स्तरावरील बक्षीस मिळवण्यासाठी प्रयत्न करणार अशी जिद्द निर्माण होऊन बक्षीस मिळवण्याची चुरस निर्माण झालेली आहे. प्रशिक्षणार्थीच्या ॲप मधील अडचणींवर चर्चा करून त्या सोडवण्यात आल्या. अँपवर गटांची माहिती माहिती अपडेट करण्यात आली. पुढील कामांचे नियोजन करण्यात आले. आजच्या प्रशिक्षणाचे नियोजन पाणी फॉउंडेशनचे तपस्वी मॅडम, हितेश सर व उमेदचे प्रभाग समन्वयक तथा मेंटॉर हेमचंद बोरकर यांनी केले. प्रशिक्षण दरम्यान प्रभागातील सर्व शेतकरी गटाचे निमंत्रक व सदस्य उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *