ताज्या घडामोडी

फॉर्मर कप स्पर्धेकडे यशस्वी वाटचाल

दिनांक 13/08/2026 ला मौजा अमरपूरी येथील
पाटील ऍग्रो पुरुष शेतकरी गटला मा. तालुका कृषी अधिकारी, चिमूर श्री. पुजारी सर यांनी फार्मर कप मध्ये सहभाग घेण्यात आलेल्या गटास विशेष भेट दिली.
​या भेटीदरम्यान त्यांनी गटातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सोयाबीन या प्रमुख पिकांची एस.ओ.पी. नुसार सविस्तर पाहणी केली.


​सोयाबीन पिकाची सद्यस्थिती, झाडांची वाढ, कीड व रोगांचा प्रादुर्भाव या गोष्टींची SOP नुसार प्रत्यक्ष शेतात जाऊन बारकाईने पाहणी करण्यात आली
​फार्मर कप गटातील शेतकऱ्यांना हवामानातील बदलानुसार पिकांचे व्यवस्थापन कसे करावे, संतुलित खतांचा वापर आणि एकात्मिक कीड व रोग नियंत्रण (IPM) बाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.शेतकरी गटांच्या माध्यमातून एकत्र येऊन शेती केल्यास उत्पादनावरील खर्च कसा कमी करता येईल,तांत्रिक पद्धतींचा अवलंब केल्यास पिकांची उत्पादकता निश्चितच वाढेल या बाबत सविस्तर उत्तम मार्गदर्शन केले.”पानी फाउंडेशनच्या फार्मर कप च्या माध्यमातून शेतकरी एकत्र येऊन एस.ओ.पी. नुसार शेती करत असल्याचे पाहून विशेतः पुरुष शेतकरी गट पाहून त्यांना समाधान वाटले.
गटाला मार्गदर्शन व चर्चा करण्यासाठी उपस्थित
​मा.तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, श्री. वामन साहेब कृषी सहायक , श्री. हेमचंद बोरकर उमेद ( मेंटर) व ​गावातील गटातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close