स.पो.नि.फिरोज पठाण यांची अवैध गुटखा विकणाऱ्या वर दंबग कारवाई
इरशाद अली यांच्या फिर्यादीवरून मानवत येथे गुन्हा दाखल.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत येथे स.पो.नि फिरोज पठाण यांची अवैध गुटखा विक्री करणार्यावर कारवाई सविस्तर वृत्त असे की…. पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. फिरोज पठाण इरशाद अली, व पाळवदे, शहरात पेट्रोलिंग करत असताना गोलाईत नगरच्या टी पॉईंट जवळ एक संशयित व्यक्ती पांढऱ्या कापडी बॅग मध्ये अवैधरित्या गुटखा विक्री करत असताना आढळून आल्यास त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन इर्शाद अली यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला तसेच आरोपीला विचारपूस केली असता त्यांनी हेमाल पाथरी इथून आणले असे सांगितल्यावर सपोनि फिरोज पठाण इरशाद अली, समीर पठाण, शरीफ पठाण,चालक आकमार,यांनी मानवत पाथरी व माजलगाव येथे जाऊन छापा मारला असता तेथे त्यांना 2लाख 89 हजार 979 रुपयाचा मुद्देमाल सापडला असता ते सर्व पोलीस स्टेशन येथे आणून जप्त करण्यात आला आहे… संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास स.पो.नि.फिरोज पठाण करित आहे.