ताज्या घडामोडी

पाथरी नगरपरिषद निधीचा हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 12 ऑगस्ट नगरपरिषदेच्या कारभारावर आक्षेप घेत संबंधित विकासकामांसाठी उचलण्यात आलेल्या निधीचा हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी पाथरी नगरपरिषद विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाथरी नगरपरिषद कार्यालयासमोर तंबू ठोकून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.


संबंधित विकासकामांसाठी निधी उचलण्यात आला असून, त्या निधीचा प्रत्यक्ष विनियोग कशाप्रकारे करण्यात आला, याचा सविस्तर हिशोब प्रशासनाने द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे. याबाबत परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, तक्रारीनंतर प्रशासनाकडून अपेक्षित भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे.


नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून विकासकामांसाठी वापरण्यात आलेल्या निधीचा संपूर्ण तपशील जनतेसमोर मांडावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. जोपर्यंत या मागण्यांवर ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशाराही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, नगरपरिषद कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले हे साखळी उपोषण बेमुदत सुरू ठेवण्याचा निर्धार विरोधी पक्षाने व्यक्त केला असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित बाबींवर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close