आंबोली येथे राष्ट्रीय ओबीसी महीला व पुरुष महासंघाची शाखा गठीत

चिमुर तालुक्यात ओबीसी जनगणनेसाठी मँराथान बैठका
भिसी प्रतिनिधी : विलास दिघोरे
ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी. जनगणनेत ओबीसी चा काँलम निर्माण व्हावा व ओबीसी समाजाची चळवळ तयार करण्यासाठी आंबोली येथे राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची शाखा व पुरुष राष्ट्रीय ओबीसी महासंघ ची शाखा ग़ठीत करण्यात आली. ओबीसी समाजाला संविधानीक अधिकार मिळावा ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे यासाठी महिला सक्षमिकरणाची गरज आहे या हेतूने शाखा गठित करण्यात आली.
राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ शाखा आंबोली च्या अध्यक्ष पदी प्रियंका नागोसे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी मनिषा गारघाटे यांची निवड करण्यात आली. सचिव पदी प्रेमिला ठाकरे यांची निवड करण्यात आली.
तर पुरुष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ अध्यक्ष पदी नंदु ठाकरे , उपाध्यक्ष पदी राजु लाकडे ,सचिवपदी कपिल अतकरे कार्याध्यक्ष पदी मधुकर नागपुरे ,सहसचिव पदी संदिप अतकरे यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री गजाननराव अगडे प्रमुख पाहुणे म्हणून रामदासजी कामडी , कवडूजी लोहकरे , सौ ममता डुकरे, यामिनी कामडी, ईश्वर डुकरे , सौ रजनी भुजाडे सौ. राउत उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित पदाधिका-याचे अभिनंदन करण्यात आले.