ताज्या घडामोडी

इंधन दरवाढीविरोधात मुल येथे काँग्रेस कमिटीचे केंद्र सरकार विरुद्ध निषेध आंदोलन

तालुका प्रतिनिधी:हेमंत बोरकर मुल

मा.ना. नानाभाऊ पटोले, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र व विजयभाऊ वडेट्टीवार पालकमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या चंद्रपूर दौरा उपस्थिती निमित्याने मा.संतोषभाऊ रावत, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष व माजी जि. प. अध्यक्ष यांचे नेतृत्वात मुल येथे सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण देश सध्या कोविड-१९ च्या दुसऱ्या टप्प्यातून सावरत असताना, केंद्र सरकार मात्र विविध जीवनावश्यक वस्तुवर दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला लुटन्याचे काम करत आहे.
सद्या देशात भाजपाचे सरकार आहे, सबका साथ सबका विकास अशा घोषणा देऊन भाजपा सरकार सत्तेत आलं, परंतु भाजपा सरकारने शेतकरी, गरीब, सामान्य व सर्वसाधारण जनतेची निराशा केली आहे.
मागील काही दिवसापासून इंधन दरवाढीचा भडका उडाला असून पेट्रोल शंभरी पार व डिझेल नव्वदी पार गेल्याने सर्वसामान्य जनतेला आर्थिक अडचनीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही दरवाढ कमी करावी या मागणी मुल येथे मा. संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात मुल तालुका व शहर कांगेस च्या वतीने गांधी चौक मुल व पेट्रोल पंप येथे आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलन मधे मुल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व कृषि उत्पन्न बाजार समिति सभापति मा.घनश्यामभाउ येनुरकर, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष मा. राकेश रत्नावार, चंद्रपुर कृषि उत्पन्न बाजार समिति सभापति मा. दिनेश चोखारे, मुल बाजार समिति उपसभापति मा. संदीप कारमवार, युवक कांग्रेस अध्यक्ष मा. पवन नीलमवार, मा. अखिल गांगरेडीड्डीवार, मा. राजेन्द्र कन्नमवार, महिला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षा मा. रुपालीताई सन्तोषवार, मा.सुनील शेरकी,मा .पुरुषोत्तम भुरसे, नगरसेवक मा.विनोद कामडे, वैशाली पुल्लवार, मंगला आत्राम यांचेसह असंख्य कांगेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close