रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा संपन्न

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या मौजा सिरपूर येथे शिव जन्मोत्सव समिती सिरपुर आयोजित हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छञपती शिवाजी महाराज यांची जयंती कार्यक्रम दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोज बुधवारला सांयकाळी ६:०० वाजता हनुमान मंदीराच्या प्रांगणात संपन्न झाला.

शिवाजी महाराज यांच्या फोटो फलकाचे अनावरण करून जयंती सोहळाला सुरवात झाली.
जयंती सोहळा निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा व मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मध्ये विशेष आकर्षण छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकात्मक वेषभूषा होती.

सदर कार्यक्रमात वैद्यकीय सेवा देणारे सविता कोवे (परिचारिका प्रा.आरोग्य उपकेंद्र सिरपुर),वंदना यादव घुटके( से.नि.मदतनीस प्रा.आरोग्य उपकेंद्र सिरपुर) यांचा सत्कार करण्यात आला. तरी या कार्यक्रमाला मान्यवर
कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास कुमरे (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सिरपुर),
प्रमुख वक्ते सुभाषजी ईटनकर (मु. आरमोरी जिल्हा गडचिरोली.
चंद्रपूर विभाग कार्यवाह रा. स्व. संघ.)
प्रमुख अतिथी ईश्वर लेनगुरे (अध्यक्ष तंटामुक्ति समिती सिरपुर),
मंगेश भानारकर (पो. पा. सिरपुर), जयपाल गावतुरे (सरपंच), राजेंद्र भानारकर( उपसरपंच),भुनेश्वर गावतुरे (अध्यक्ष सेवा सह. सोसायटी.सिरपुर ),सुरेश भानारकर (अध्यक्ष गुरूदेव सेवा मंडळ सिरपुर ) , ऋषी पा. सुकारे,मोतीरामजी सुकारे, विलास. पा. बोरकर,दिवाकर डहारे,मनोहर शेन्दरे,अमोल तुमराम, संजय कृ. बोरकर,,पुष्पा कापगते, वर्षा डहारे,सुनिता कुंभरे. उपस्थित होते.
प्रस्तावना स्वराज निकोडे यांनी केले तर सदर कार्यक्रमाचे सुञसंचालन संगीता बोरकर यांनी केले आणि आभार सुधीर सुकारे यांनी मानले.