ताज्या घडामोडी

मा.खा. अशोक नेते यांचा लोकमत समुहातर्फे ‘लोकनायक’ म्हणून सन्मान

नागपूर येथे ना.गडकरी यांच्या हस्ते सन्मानित

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळापासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांना लोकमत वृत्तपत्र समुहाकडून ‘लोकनायक’ हा सन्मान देऊन गौरविण्यात आले. नागपूर येथील वसंतराव नाईक मेमोरियल हॅालमध्ये शनिवारी झालेल्या समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देण्यात आले.

लोकमत समुहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॅा.विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात लोकनायक ठरलेल्या लोकप्रतिनिधींची माहिती असलेले कॅाफीटेबल बुक प्रकाशित करण्यात आले. यात माजी खा.अशोक नेते यांच्याबद्दलही माहिती देण्यात आली आहे. यावेळी दिलेल्या मानपत्रात डॅा.विजय दर्डा यांनी, नेते यांच्याबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले. समाजकारण अन् राजकारण यांची योग्य सांगड घालत आपण विदर्भाच्या प्रगतीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहात. संवेदनशिलता, कठोर परिश्रम, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण करत असलेली जनसेवा ही नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यामुळे आपणास हे मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येत असल्याचे डॅा.दर्डा यांनी नेते यांना दिलेल्या मानपत्रात नमूद केले आहे.

या कार्यक्रमाला माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आ.अभिजीत वंजारी, आ.किशोर जोरगेवार, आ.मनोहर चंद्रिकापुरे, लोकमत समुहाचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लोकमतचे संपादक श्रीमंत माने यांच्यासह विदर्भातील अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close