ताज्या घडामोडी
चींतलधाबा येथे ३o वर्षीय युवकाची आत्महत्या
ग्रामीण प्रतिनिधी :अंकुश खोब्रागडे गोवर्धन
पोंभूर्णा तालुक्यातील चींतल धाबा येथील एका 30 वर्षीय युवकाने गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना 11 वाजताच्या सुमारास घडली. मृतक युवकाचे नाव गितेश मारोती कुत्तरमारे असे आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल होऊन. मृतदेहाला विहिरीतून बाहेर काढण्यात आले व मृतदेह छवविच्छेदना करिता पाठविण्यात आले आहे. गितेश ने आत्महत्या का केली. हे अद्याप कळू शकले नाही. पोंभुर्णा ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजकुमार पुढील तपास करीत आहेत. मृतकाच्या पश्चात वडील व भाऊ आहेत.